Mahalakshmi : दुसऱ्या पतीपासून गर्भवती? `त्या` फोटोवरुन दाक्षिणात्य अभिनेत्रीला नेटकऱ्यांचा सवाल
South Actress Mahalakshmi : दाक्षिणात्य अभिनेत्री महालक्ष्मी सध्या कुठल्याही चित्रपटात दिसत नसली तरी तिच्या दुसऱ्या लग्नानंतर कायम चर्चेत असते. नेटकरी तिला सतत कुठल्या ना कुठल्या कारणावरुन ट्रोल करत असतात. अशातच तिचा तो फोटो पाहून नेटकरी ती गर्भवती असल्याचं म्हटलंय.
South Actress Mahalakshmi and Ravindar Chandrasekaran : दाक्षिणात्य अभिनेत्री महालक्ष्मीनं (Mahalakshmi) निर्माता रवींद्र चंद्रशेखर (Ravindar Chandrasekaran) सोबत दुसरं लग्न केलं त्यानंतर हे जोडप कायम चर्चेत असतात. महालक्ष्मी आणि रवींद्र चंद्रशेखर सोशल मीडियावरही खूप सक्रीय आहेत. त्यामुळे त्यांचा फोटोमुळे हे कपल नेटकऱ्यांकडून ट्रोल होतं असतं. महालक्ष्मीनं तिच्या बेडरुममधील एक फोटो शेअर केला आणि नेटकऱ्यांनी तिला थेट विचारलं 'Good News कधी?' (south actress mahalakshmi pregnant and ravindar chandrasekaran Photo shared on Instagram)
पाळणा हलणार?
नुकतंच दक्षिणेच्या चित्रपट निर्मात्याने स्टार पत्नीसोबत एक फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला. ज्यामध्ये दोघेही मंदिरासमोर फोटो क्लिक करताना दिसत आहेत. थाई पूसम या तमिळ सणानिमित्त देवतेचा आशीर्वाद घेण्यासाठी हे जोडपे मंदिरात गेले होते. चित्रपट निर्माते कामातून ब्रेक घेत महालक्ष्मीसोबत क्वॉलिटी टाइम घालवताना दिसतात.
त्याचा एक रेस्टॉरंटमधील फोटोवरुन नेटकऱ्यांनी महालक्ष्मी आई होणार आहे असं म्हटलं आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री वेगवेगळ्या फ्लेवर्सचा आस्वाद घेताना दिसतं आहे. त्याशिवाय या फोटोमध्ये अभिनेत्रीचं पोट दिसतं आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी ती आई होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
दुसऱ्या पतीपासून गर्भवती?
या फोटोवरून नेटकरी नको ते तर्क लावतं आहे. अगदी ती पहिल्या पतीपासून गर्भवती आहे, असंही एका यूजर्सने जाहीर केलं आहे.
काही असो...दुसरीकडे जिथे हेच खरं प्रेम आहे असं या जोडप्याला पाहून म्हणतात. तिथेच पैशासाठी लग्न केल्याचंही अनेक नेटकरी म्हणत आहेत. अभिनेत्रीने रवींद्रनसोबत दुसरं लग्न केलं आहे. तिला पहिल्या पतीपासून एक मुलगा देखील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महालक्ष्मी आणि रवींद्र यांची भेट 'विद्युम वरई कथिरू' चित्रपटादरम्यान झाली होती. याच्या सेटवर दोघांमधील जवळीक वाढली होती. त्याच्याशी लग्न केल्याबद्दल अभिनेत्रीने स्वतःला भाग्यवान म्हटलं होतं.