Spruha Joshi Relation With Prathmesh Laghate: सारेगमप लिटिल चॅम्पमुळं प्रकाशझोतात आलेले प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) आणि मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) यांनी त्यांच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. दोघांनीही आपल्या मैत्रीला पुढे नेत प्रेमाची कबुली दिली आहे. (Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रथमेश आणि मुग्घा यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत त्यांच्या नात्याबाबत कबुली दिली आहे. तसंच, “तुम्ही सर्व ज्या बातमीची वाट बघत होतात ती अखेर आम्ही सांगत आहोत. आमचं ठरलंय, असं कॅप्शन लिहलं आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे. त्याचबरोबर अनेकांनी त्यांच्यांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्यांच्या पोस्टवर कमेंट करत मराठी कलाकारांनीही त्यांचे अभिनंदन केले आहेत. त्यातच अभिनेत्री स्पृहा जोशीची कमेंट लक्ष वधून घेणारी ठरली आहे. 


प्रथमेश आणि मुग्धाच्या पोस्टवर स्पृहा जोशीने वा बुवा वेलकम वहिनी अशी कमेंट केली आहे. त्यावर गायक अवधुत गुप्ते यांनी वेलकम जीजू का नाही?, असा प्रश्न केला. त्यावर उत्तर देताना स्पृहा जोशीने त्यांचे नाते उलगडून सांगितले आहे. अवधुतच्या कमेंटवर रिप्लाय करत स्पृहा म्हणाली की, अहो सर, ते आधीच माझे सासरे आहेत. स्पृहाच्या या कमेंटवर मुग्धाने दुजोरा देत हो म्हटले आहे. मला जेव्हा हे कळलं तेव्हा माझंही असंच झालं की मी सासू!!! नाहीsss असं म्हटलं आहे. प्रथमेशनेही मी तिचा सासरा आहे, असा रिप्लाय दिला आहे. 



स्पृहा, अवधूत, प्रथमेश आणि मुग्धा यांच्या या कमेंट सध्या चर्चेत आहेत. त्याच्यावर अनेकांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. तर प्रथमेश आणि स्पृहा एकमेकांचे नातेवाईक आहेत हे कळल्यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. 


दरम्यान, स्पृहा जोशी हिने 28 नोव्हेंबर 2014 रोजी लग्नगाठ बांधली होती. स्पृहाच्या पतीचे नाव वरद लघाटे असं आहे. सहा वर्षे डेट केल्यानंतर स्पृहा आणि वरद यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. वरदने पत्रकार म्हणून त्याची कारकीर्द सुरू केली होती. त्यानंतर मात्र त्याने पत्रकारिता हे क्षेत्र सोडून वरद मार्केटिंग प्रोफेशनकडे वळला. 


मुग्धा आणि प्रथमेश यांनी त्यांच्या प्रेमाची कबुली देताना पोस्टमध्ये एम गॉट मोदक, मोदक गॉट मॉनिटर, कपल्स गोल्स असे हॅशटॅगही वापरले आहेत. सोशल मीडियावर ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.