Jackie Shroff Hero : बॉलिवूडमुळे चित्रपटसृष्टीला अनेक मौल्यवान कलाकार मिळाले, असं अनेकदा म्हटलं जातं. पण या विधानाला सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई मात्र अपवाद आहेत. कारण सुभाष घई यांच्या चित्रपटामुळे अनेक कलाकार हे बॉलिवूडला मिळाले. सुभाष घई हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक आहेत. कालीचरण, हीरो, जंग, कर्मा, राम लखन, सौदागर, खलनायक, देश, ताल या सर्वोत्कृष्ट चित्रपटांसाठी ते ओळखले जातात. सुभाष घई यांनी जवळपास 16 चित्रपटांचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. त्यापैकी 13 चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. तर 2006 मध्ये त्यांना 'इक्बाल' या सामाजिक चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान, दिग्दर्शक सुभाष घई यांनी 41 वर्षानंतर त्यांच्या गाजलेल्या चित्रपटातील  रंजक पण महत्वाचे किस्से सांगितलेत. बॉलिवूड स्टार जॅकी श्रॉफचा एक चाळीत राहणाऱ्या सामान्य माणूस ते बॉलिवूडचा सुपरस्टार या प्रवासामागे सुभाष घईंचा मोठा वाटा आहे, असा किस्सा सुभाष घई यांनी सांगितला. 


1983 साली सुभाष घईंनी दिग्दर्शित हिरो हा चित्रपटानं बॉक्स ऑफिस गाजवलं होतं. याच चित्रपटातून जॅकी श्रॉफनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा जॅकी श्रॉफचा पहिलाच चित्रपट होता. विशेष म्हणजो हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप गाजला. पण तुम्हाला माहित आहे का, जॅकी श्रॉफचा आणि अभिनयाचा दूरवर ही संबंध नव्हता, मग तरीही सुभाष घईंनी चित्रपटासाठी अशा नवोदित कलाकाराला संधी का दिली? तुम्हालाही असा प्रश्न पडला असेल ना, तर त्यामागचं कारण समोर आलं आहे. 


सुभाष घई यांनी 'या' सुपरहिट चित्रपटात जॅकीला का कास्ट


जेव्हा सुभाष घई जेव्हा पहिल्यांदा जॅकी श्रॉफला भेटले होते. तेव्हा त्यांनी जॅकीला काही प्रश्न विचारले होते. तुला डान्स करता येतो का ? गाण्यांबद्दल काही माहिती आहे का? या दोन्ही प्रश्नावर जॅकी श्रॉफने नाही असं उत्तर दिलं. यानंतर सुभाष घईंनी विचारलं होतं की मग तुला अभिनय तरी येतो? बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक जेव्हा हा प्रश्न विचारतात तेव्हा जॅकी श्रॉफने आजूबाजूला पाहिलं आणि अभिनय नाही येत असं सांगितलं. यावेळी जॅकी श्रॉफच्या डोळ्यातील प्रामाणिकपणा आणि त्यांचा सरळ साधा स्वभाव पाहून त्याची थेट मुख्य अभिनेत्यासाठी निवड केली. या चित्रपटाचे नाव 'हिरो' असे होतं. 


स्टार होऊनही जॅकी श्रॉफ चाळीत राहत होता.. 


जॅकी श्रॉफचा हिरो हा चित्रपट प्रचंड गाजला. याने बॉक्स ऑफिसवरही अनेक रेकॉर्ड केले. पण हिरो चित्रपटाच्या यशानंतरही जॅकी हे चाळीत राहत होते, यामागे एक विशिष्ट कारण होते. त्याचा खुलासा जॅकी श्रॉफने एका मुलाखतीदरम्यान केला. "मला स्टारडमबद्दल जराही माहिती नव्हती. चित्रपटाच्या यशानंतर आजही मी अगदी तसाचं राहतो. माझा चित्रपट हिट झाला असला तरी  मी काही मोठं केलेलं नव्हतं. माझ्या आई-वडिलांसाठी ही सिनेसृष्टी नवीन होती. त्यांना या सिनेसृष्टीशी संबंधित काहीही माहिती नव्हती. त्यांच्या मुलाला काहीतरी काम मिळालं आहे, एवढचं त्यांना माहित होतं. मी मॉडेल आणि अभिनेता व्हायच्या अगोदर ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम केलं होतं. परंतु माझ्या पालकांसाठी, मला काही काम मिळालं ही सर्वात मोठी गोष्ट होती. त्यांच्यासाठी मला एका चित्रपटात मुख्य अभिनेत्याची भूमिका मिळाली आहे, हेच फार मोठं होतं, असे जॅकी श्रॉफ यांनी सांगितले.