Subhedar Movie: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'सुभेदार' या चित्रपटाची. यावेळी चर्चा आहे ती म्हणजे या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची. 'सुभेदार' या चित्रपटानं आतापर्यंत 5 कोटींच्यावर बॉक्स ऑफिसवर कमाई केली आहे. तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. 'गड आला पण सिंह गेला', आपल्या वीरपराक्रमानं कोंढाणा किल्ला जिंकणारे तानाजी मालुसरे यांची ही शौर्यगाथा प्रत्येकानं पाहवी अशीच आहे. यावेळी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. दिग्पाल लांजेकर यांच्या 'श्रीशिवराजअष्टक' मधील हे पाचवे पुष्प आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्ववान शिलेदारांची ही कथा आहे. यावेळी तानाजी मालुसरे यांच्या कुटुंबांचेही दर्शन होताना दिसते. त्यातून यावेळी त्यांच्या पराक्रमाची आपल्याला पुन्हा एकदा नव्यानं ओळख होते. यावेळी चर्चा आहे ती म्हणजे दिग्पाल लांजेकर यांची. दिग्पाल लांजेकर यांनी नुकत्याच एका मुलाखतीतून एक किस्सा सांगितला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर कुठलाही ऐतिहासिक चित्रपट म्हटला तर त्यासाठी योग्य ते संशोधन करावे लागतेच. त्यातून सर्व पात्रांचा आणि त्याचसोबत त्यांच्या जीवनशैलीचाही अभ्यास करावा लागतो. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर याचीही कायमच तीच भुमिका राहिली आहे. आपल्या प्रत्येक चित्रपटातून तो सर्व बाजूंचा अभ्यास करतो. या चित्रपटासाठीही त्यानं खास मेहनत घेतली आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी त्यानं 'बीबीसी मराठी'ला दिलेल्या मुलाखतीतून तानाजी मालुसरेंच्या कुटुंबात लग्नसराईतील परंपरांबद्दल माहिती दिली आहे. 


हेही वाचा : पोटाचा घेर कसा कमी करू गं बाई? घरी बसल्या बसल्या करा 'हे' व्यायाम


''‘सुभेदार’ चित्रपटासाठी आम्ही प्रचंड मेहनत घेत होतो यावेळी संशोधन करताना अनेक गोष्टी आमच्या समोर आल्या आहेत. तानाजी मालुसरेंच्या घरी होणाऱ्या प्रत्येक लग्नकार्यात पीठाचे 360 दिवे लावतात आणि त्यानंतर हे दिवे ओल्या धोतराने फटका मारून विझवले जातात. असा एक संपूर्ण विधी आहे. या विधीबाबत जेव्हा मी माहिती घेतली तेव्हा कळलं की, हे दिवे म्हणजे सिंहगडाच्या युद्धाचे प्रतीक आहे. ज्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी सिंहगडाच्या युद्धात बलिदान दिलं त्याचे प्रतीक म्हणून मालुसरेंच्या घरात त्यावेळापासून हे दिवे लावले जातात. त्यांच्या घरातील प्रत्येक मंगलकार्यात 360 दिवे लावून वीरांचं स्मरण केलं जाते.'' अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.


यावेळी या चित्रपटातून चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, मृणाल कुलकर्णी,  समीर धर्माधिकारी, स्मिता शेवाळे, शिवानी रांगोळे, विराजस कुलकर्णी, अभिजीत श्वेतचंद्र अशी तगडी स्टारकास्ट आहे.