पोटाचा घेर कसा कमी करू गं बाई? घरी बसल्या बसल्या करा 'हे' व्यायाम

Excercise for Belly Fats: आपल्याला आपल्या वाढलेल्या वजनाची फार चिंता असते. त्यामुळे वाढलेलं वजन हे कसं कमी करावं यासाठी आपल्याला अनेक गोष्टी या कराव्या लागतात. त्यातून तुम्ही बसल्या बसल्या काही व्यायामही करू शकता जेणेकरून तुम्हाला तुमचे पोट कमी करण्यासाठी चांगला फायदा होऊ शकेल. 

गायत्री हसबनीस | Updated: Aug 29, 2023, 05:45 PM IST
पोटाचा घेर कसा कमी करू गं बाई? घरी बसल्या बसल्या करा 'हे' व्यायाम  title=
how to reduce belly fats with sitting excercise

Excercise for Belly Fats: वाढलेल्या वजनाचा आपल्या सर्वांनाच त्रास होत असतो. त्यामुळे आपण अनेक तऱ्हेचे उपाय करताना दिसतो. आपल्याला नानाविध गोष्टी या कराव्या लागतात. त्यातून आपलं वजन कमी करण्यासाठी आपण घरच्या घरी काय काय करू शकतो याचीही आपल्याला अनेकदा शोधाशोध करावी लागते. त्यातून आपण योगा करतानाही कशाप्रकारे आपलं वजन कमी होऊ शकेल याच्यावरही आपल्याला लक्ष देणे फार आवश्यक आहे. आपल्याला विविध गोष्टींची काळजी घ्यावी लागते. त्यातून खाण्यापिण्यावर आपल्याला विशेष लक्ष द्यावे लागते. अशावेळी आपण योगासनांवरही चांगल्या प्रकारे भर देऊ शकतो. तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी करता येतात. त्यातून सर्वात पहिली गोष्ट म्हणजे असते ती म्हणजे तुम्ही घरबसल्या घरच्या घरी कसं काय वजन कमी करू शकता. यातूनही आपल्याला सगळ्यात जास्त चिंता करण्याची बाब असते ती म्हणजे पोटाच्या घेराची. पोटाचा घेर वाढला की आपल्यालाही फार काळजी वाटू लागते.

त्यामुळे पोटाचा घेर कसा कमी करायचा याची आपल्यालाही चिंता लागून राहिली असते. तेव्हा तुम्ही घरबसल्या अशा अनेक एक्सरसाईज म्हणजेच व्यायाम करू शकता. ज्यांचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. तेव्हा पाहुया यामध्ये नक्की कोणत्या व्यायामांचा समावेश आहे. अनेकदा आपण असाच विचार करतो की जास्त घाम गाळल्यानं आपली वाढलेली चरबी ही कमी होऊ शकते. परंतु तुम्ही घरबसल्याही पोटाचा घेर हा कमी करू शकता. चला तर मग जाणून घेऊया की तुम्ही घरच्या घरी आपल्या पोटाचा घेर कसा कमी करू शकता? यावेळी तुम्ही योग्य त्या प्रकारे घरी स्पॉर्ट्सचे कॉश्चुम्स घालून व्यायाम करू शकता. 

हेही वाचा : लग्नापुर्वी प्रेग्नंन्टचा शिक्का, दोनदा लग्न; पण चाहते म्हणतात 'ही' परफेक्ट गर्लफ्रेंड, अभिनेत्रीला ओळखलं?

  • खुर्चीवर बसल्या बसल्या तुम्ही व्यायाम करू शकता. खुर्चीवर बसून तुम्ही हा बैठा व्यायाम करू शकता. त्यातून तुम्ही पहिल्यांदा खुर्चीवर ताठ बसा आणि मग आपले दोन्ही पाय हे बसल्याबसल्या सरळ करा आणि त्यातून तुम्ही योग्य प्रकारे पाय खालीवर करून अशाप्रकारे 15-20 वेळा हा व्यायाम पुर्ण करा. 
  • खुर्चीवर बसल्या बसल्या तुम्ही बॉडी स्ट्रेच करा म्हणजेच आपले हात मागे करा आणि खुर्चीसोबत बसून ते स्ट्रेच करा. 
  • त्याचसोबत तुम्ही रशियन ट्विस्टही करू शकता. यावेळी तुम्ही आरामात खुर्चीवर बसून हाताची घडी घाला आणि मग मागे टर्न व्हा.
  • अशाचप्रकारे तुम्ही रशियम ट्विस्टप्रमाणे चेअर ट्विस्टही करू शकता. 
  • त्याचसोबत खुर्चीवर बसून तुम्ही बायसायकल क्रचेस करू शकता. खुर्चीवर बसा आणि मग एक पाय वर करत डोक्यावर हात लावा आणि मग ज्या दिशेला पाय वर कराल त्याच्या विरूद्ध दिशेला करा. 
  • तुम्ही बसल्या बसल्या पुल-अप्स करू शकता. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)