Subodh Bhave : सुबोध भावे म्हणजे मराठी चित्रपट, मालिका आणि रंगभूमीवरील मोठं नाव. आज सुबोध यांचं नाव मराठीतील आघाडीच्या अभिनेत्यामध्ये घेतलं जात. सुबोध यांच्या अभिनयाची दाखल केवळ मराठीच नाही तर हिंदी सिनेश्रुष्टीमध्ये देखील घेतली जात आहे. म्हणूनच अनेक हिंदी मालिका आणि वेब सीरिजमध्ये सध्या सुबोध भावे आपला पाय रोवताना दिसत आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुबोध भावे सोशल मिडियावर देखील चांगलेच सक्रिय आहेत तिथे ते आपल्या चाहत्यांना त्यांच्या आयुष्यतल्या विशेष घटना अनुभवांबद्दल नेहमीच किस्से शेयर करत असतात. नुकताच सुबोध भावे यांनी आपल्या सोशल मिडियावर  एक अनोखा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी आपल्या पत्नी मंजिरी हिला प्रपोझ केलं त्या दिवशीचा आठवणी शेयर केल्या आहेत. या दिवसाला तब्बल 33 वर्ष पूर्ण झाल्याने सुबोध यांनी आपली पत्नी मंजिरीला शुभेच्छा दिल्या आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


6 मे 1991 रोजी सुबोध यांनी  त्यांची पत्नी मंजिरी हिला प्रपोझ केलं होतं. सुबोध यांनी त्या दिवसाला उजाळा दिला आणि मंजिरीला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांची पत्नी मंजिरी यांना शुभेच्छा देताना सुबोध यांनी मंजिरीबद्दलचे आपले प्रेमही व्यक्त केले, पण या व्हिडिओची खास गोष्ट ही आहे की या व्हिडिओत सुबोध यांचा चेहरा चक्क तरुणपणातल्या सुबोधसारखा दिसत आहे!  प्रेक्षक या व्हिडिओमुळे खूश झाले आहेत. कारण सुबोध यांनी त्यांच्या सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.


हेही वाचा : Met Gala 2024 साठी आलियाने लूक केला कॉपी? रणबीरच्या EX गर्लफ्रेंड ठरल्या इन्स्पिरेशन!


त्याशिवाय या व्हिडिओ दरम्यान सुबोध यांना त्यांच्या प्रेमकथेची आठवण झाली कारण, तो त्यांचा प्रपोझल दिवस होता. सुबोध यांनी ही खास आठवणी प्रेक्षकांसोबत शेअर केल्या आहेत. हा व्हिडिओ पाहून मंजिरीसोबतच त्यांचे चाहतेही खूश झाले आहेत. एक आदर्श जोडीदार कसा असावा, हे त्यांनी दाखवून दिले आहे. आपली पत्नी मंजिरी हिलाआगळ्या अंदाजात शुभेच्छा देत सुबोध यांनी तिचं मन जिंकलं आहे!.