मुंबई : सोशल मीडियावर स्टार किड्समध्ये शाहरूखच्या मुलीला अधिक पसंती आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुहानाचे अनेक फॉलोअर्स आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सुहानाची सोशल मीडियावर भरपूर चर्चा आहे. चाहते वाट पाहत आहेत की, किंग खानप्रमाणे सुहाना कधी पडद्यावर दिसणार? यावर शाहरूख खानने कायम गोपनियता ठेवली. मात्र पहिल्यांदाच गौरी खान म्हणजे सुहानाच्या आईने मोठा खुलासा केला आहे. 


काय म्हणाली गौरी खान? 


11 मार्चमध्ये Hello ! Hall of Fame Awards 2018 च्या रेड कारपेटवर गौरी खान, शाहरूख खानसोबत सुहाना देखील पोहोचली होती. यावेळी जेव्हा त्यांना सुहानाच्या डेब्यूबाबत विचारलं असता गौरी खानने  मौन सोडलं आहे. सुहाना आता एका मॅग्झिन शूटमध्ये बिझी असल्याचं सांगितलं. मात्र त्याचं नाव काय हे मी आता सांगू शकत नाही असं देखील तिने सांगितलं आहे. 



सुहाना बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार का? 


सुहानाचं एका मॅग्झिनसाठी फोटोशूट करणं हे बॉलिवूड एन्ट्री करता निमंत्रण देणं असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. असं म्हटलं जातं की, हेच फोटोशूट तिच्या करिअरसाठी महत्वाचं ठरू शकतं. गेल्या काही दिवसांपासून सुहाना आपल्या ड्रेसिंग सेन्सबाबत भरपूर चर्चेत होती.