Nora Fatehi Reached ED Office In Sukesh Chandrasekhar Case : काही दिवसांपूर्वी सुकेश चंद्रशेखरच्या (Sukesh Chandrashekhar) 200 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी पिंकी इराणीला (Pinky Irani) अटक केली. न्यायालयाने पिंकीला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, आता पुन्हा एकदा बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीची (Nora Fatehi) सध्या ईडी चौकशी करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोरा फतेही दिल्लीच्या ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाली आहे. 200 कोटींची अफरातफर केल्याप्रकरणी ही चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सुकेश चंद्रशेखर असून, नोराला या केसमध्ये माफीची साक्षीदार बनवलं जाणार आहे. नोरा फतेहीसह जॅकलिन फर्नांडिसही (Jacqueline Fernandez)  या प्रकरणात आरोपी आहे. 


हेही वाचा : Sukesh Chandrashekhar Case: दिल्ली पोलिसांकडून पिंकी इराणीला अटक, जाणून घ्या संपुर्ण प्रकरण



दिल्लीच्या ईडीच्या कार्यलयात पोहोचलेल्या नोरानं निळ्या रंगाची जीन्स आणि ब्राउन रंगाचं टॉप परिधान केलं आहे. नोराची चौकशी करण्याची ही पहिली वेळ नाही तर या आधीही तिची चौकशी करण्यात आली आहे. रिपोर्ट्सनुसार, सुकेश चंद्रशेखरची चौकशी करण्यात येईल आणि मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) कलमांतर्गत त्यांचे जबाब नोंदवले जातील. ईडीनं या प्रकरणात दाखल केलेल्या आधीच्या आरोपपत्रात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे नाव आरोपी म्हणून ठेवले होते, तर या प्रकरणी नोरा फतेहीचा जबाब नोंदवण्यात आला होता.


हेही वाचा : 'काहीही करते म्हणून हिला प्रसिद्धी मिळते', Hemangi Kavi चं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर


ईडीने आपल्या आरोपपत्रात जॅकलिनलाही आरोपी म्हटले होते. गेल्या महिन्यात, जॅकलिनला 2 लाख रुपयांचा जामीन मंजूर करण्यात आला होता. यापूर्वी, पोलिसांनी पिंकी इराणीला अटक केली होती, पिंकीनं जॅकलीन फर्नांडिसची सुकेश चंद्रशेखरशी ओळख करून दिली होती. ईडीच्या म्हणण्यानुसार, जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांची फसवणूक करणारा सुकेश चंद्रशेखरकडून अनेक आलिशान कार आणि इतर महागड्या भेटवस्तू मिळाल्या होत्या.