'काहीही करते म्हणून हिला प्रसिद्धी मिळते', Hemangi Kavi चं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

Hemangi Kavi नं सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ शेअर करत ट्रोलर्सना हेमांगीनं सडेतोड उत्तर दिलं आहे. 

Updated: Dec 2, 2022, 01:36 PM IST
'काहीही करते म्हणून हिला प्रसिद्धी मिळते', Hemangi Kavi चं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर title=

Hemangi Kavi Video : कलाविश्वात असे अनेक कलाकार आहेत, जे अनेक मुद्द्यांवर आपलं ठाम मत मांडत असतात. यामुळे ते अनेकदा वादाच्या भोवऱ्यात देखील अडकतात. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi). हेमांगी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. आपल्या अभिनयाने आणि विनोदीबुद्धीनं चाहत्यांचं मनोरंजन करणारी हेमांगी पुन्हा एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. यावेळी हेमांगीनं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे. 

पाहा काय म्हणाली हेमांगी कवी 

हेमांगीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे . या व्हिडीओत तिनं सध्या सोशल मीडियावर ट्रेंडींग असलेलं एक रील बनवलं आहे. यात दोन व्हिडीओ असून हेमांगीनं डाव्या बाजुच्या व्हिडीओला लिहिले आहे की 'ही काहीही करते म्हणून हिला प्रसिद्धी मिळते.' तर उजव्या बाजुच्या व्हिडीओत लिहिले आहे की 'प्रसिद्धी मिळावी म्हणून ही काहीही करते.'  हेमांगीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेमांगीनं हा व्हिडीओ शेअर करत त्याला कॅप्शन दिलं की 'इंडस्ट्रीतील काही लोकांच्या, माझ्या कुटुंबातील काही लोकांच्या, काही खास मित्र-मैत्रिणींच्या म्हणण्यानुसार, तसंच ट्रोलर्स आणि द्वेष करणाऱ्या सगळ्यांसाठी…अलग से !' हेमांगीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून नेटकऱ्यांनी यावर भन्नाट कमेंट केल्या आहेत. 

हेही वाचा : Hardeek - Akshaya: राणादा- पाठकबाईंचा जीव कायमस्वरुपी एकमेकांत रंगला...पाहा लग्नातील पहिले फोटो

दरम्यान, हेमांगीच्या पोस्टवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, 'हे आवडलय ताई आहे तू काहीही करतेस पण एकटीच करतेस.' दुसरा नेटकरी म्हणाला, जे करतेस ते उत्तम आहे. उगीच नावे ठेव न्यापेक्षा बरे'. तिसरा नेटकरी म्हणाला, 'तू हे करत रहा तू जे करतेस ते सगळ्यांना जमत नाही.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'हो तू काहीही करते पण भारी करतेस.'