Sukesh Chandrashekhar Case: दिल्ली पोलिसांकडून पिंकी इराणीला अटक, जाणून घ्या संपुर्ण प्रकरण

Sukesh Chandrashekhar Case: 200 कोटी रूपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे (Money Laundering Case) चर्चेत आलेल्या सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) सोबत बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिक फर्नांडिसचं आणि नोरा फतेहीचे नाव जोडले गेले होते. 

Updated: Nov 30, 2022, 07:59 PM IST
Sukesh Chandrashekhar Case: दिल्ली पोलिसांकडून पिंकी इराणीला अटक, जाणून घ्या संपुर्ण प्रकरण title=

Pinky Irani Arrested : सुकेश चंद्रशेखरच्या (Sukesh Chandrashekhar) 200 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी पिंकी इराणीला (Pinky Irani) अटक केली आहे. न्यायालयाने पिंकीला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. 

कोण आहे पिंकी इराणी? 

पिंकी इराणी (Pinky Irani) ही सुकेशची (Sukesh Chandrashekhar) मॅनेजर असल्याची माहिती आहे. पिंकी इराणीच्या (Pinky Irani Arrested) माध्यमातून सुकेशने जॅकलिनला भेटवस्तू आणि पैसे दिले होते. तसेच पिंकी इराणीमुळेच सुकेश आणि जॅकलिनची भेट झाली होती. नोरा फतेही (Nora Fatehi) आणि जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) यांच्या चौकशीत पिंकी इराणीचे नावही समोर आले. तसेच पिंकी इराणीला याआधीही पोलिसांनी चौकशीच्या अनेकदा बोलावले होते.  

...म्हणून पिंकी इराणीला अटक 

सुकेश चंद्रशेखरच्या (Sukesh Chandrashekhar) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात पिंकी इराणीला चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या सूत्रांकडून मिळाली आहे. या चौकशीत तपास अधिकाऱ्यांना सबळ पुरावे मिळाल्यानंतर तिला अटक करण्यात आली होती. यानंतर तिला संबंधित न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने पिंकीला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

दरम्यान 200 कोटी रूपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे (Money Laundering Case) चर्चेत आलेल्या सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) सोबत बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिक फर्नांडिसचं आणि नोरा फतेहीचे नाव जोडले गेले होते. या प्रकरणात आणखीण अभिनेत्रींची नावे समोर येण्याची शक्यता होती. या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिस करत आहेत.