Sunny Deol on relationship with step sister Esha : बॉलिवूड अभिनेता सनी देओल हा त्याच्या 'गदर 2' या चित्रपटामुळे चर्चेत असला. तरी दुसरीकडे त्याची सावत्र बहीण ईशा देओल हिच्यासोबत असलेलं त्याचं नात देखील अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. ईशा देओलकडून ठेवण्यात आलेल्या 'गदर 2' च्या स्क्रीनिंगनंतर त्या दोघांमध्ये दुरावा असल्याची बातमी थांबली. दोघांनी एकमेकांविषयी काही वक्तव्य केलं नाही मात्र, त्या दोघांनी पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ दिल्या होत्या. दरम्यान, आता सनी देओलनं त्याच्या बहिणीसोबतच्या गुंतागुंतीच्या रिलेशनशिपवर प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सनी देओलनं नुकतीच झूमला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत सावत्र बहिण ईशा देओलसोबत असलेल्या नात्यावर बोलत असताना सनी देओल म्हणाला, 'मला याआधी खूप दु:खातून गेलो आणि खूप त्रास सहन करावा लागला आहे, मी या संपूर्ण प्रक्रियेतून गेलो आहे. पण मी नेहमी म्हणतो, की जेव्हा आयुष्यात आनंद येतो तेव्हा तुम्हाला दु:ख आणि त्रास काय असतो हेसुद्ध लक्षात राहत नाही. जेव्हा आनंद तुमच्या आयुष्यात येतो तेव्हा तुम्ही त्या सर्व गोष्टी विसरतात.'



सनी देओल पुढे म्हणाला, 'अनेक वर्षांपूर्वी आपल्या सगळ्यांना वाटायचे की आयुष्य एका विशिष्ट पद्धतीने पुढे जाईल. पण जेव्हा तुम्ही तुमचे आयुष्य सुरू करता तेव्हा अनेक गोष्टी किंवा परिस्थिती बदलते आणि मग तुम्हाला सगळं जुळवून घ्यावं लागतं. त्यामुळेच आपण म्हणतो की चित्रपट हे कोणत्याही स्वप्नातल्या किंवा परीच्या कथे प्रमामे आहे. आयुष्य असं नसतं. आपल्याला आपलं आयुष्य हे चित्रपटासारखं हवं आहे. पण आपलं आयुष्य हे खूप सुंदर आहे. त्याला आपणं तसंच स्वीकार करतो. त्यावर आपल्याला पश्चाताप राहत नाही. आयुष्य जसं आहे तसं स्वीकारून त्याचा तिरस्कार करू नका. निगेटिव्ह एनर्जीला तुमच्यातून बाहेर काढा आणि इतर गोष्टींचा स्वीकार करा.'


हेही वाचा : सनी देओल 'या' आजाराने होता त्रस्त, म्हणाला 'कोणालाच कळायचं नाही, मला नुसते मारायचे आणि...'


सनीनं पुढे सांगितलं की सावत्र बहीण ईशा देओलसोबत त्याचं चांगले संबंध आहेत. पुढे त्याला ईशासोबत असलेल्या त्याच्या चांगल्या संबंधांवर वडील धर्मेंद्र यांची कशी प्रतिक्रिया आहे. याविषयी विचारण्यात आले तर त्यांनी म्हटलं की ते आनंदी आहेत. त्याच्यासाठी त्याच्या वडिलांचा आनंद हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि त्यानं केलेल्या कामानं त्याच्या वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि संतुष्टता दिसते.