Sunny Deol on Nepotism : बॉलिवूड अभिनेता सनी देओल गेल्या अनेक दिवसांपासून 'गदर 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये 'गदर 2' ची संपूर्ण स्टार कास्ट व्यस्त आहे. या चित्रपटात सनी देओल हा तारा सिंग या भूमिकेत दिसत आहे. यावेळी सनी देओलनं सांगितलं की त्यांचे वडील धर्मेद्र यांनी त्याच्या करिअरमध्ये खूप मदत केली. घराणेशाही काही चुकीची नाही. खरंतर सनी देओलनं एका मुलाखतीत याविषयी एका मुलाखतीत सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मुलाखतीत सनी देओलला विचारण्यात आलं की ते अभिनेता नसते तर काय असते? यावर उत्तर देत त्यानं उत्तर दिलं की 'माहित नाही, जे माझ्या वडील करत असते तेच मी केलं असतं.' पुढे घराणेशाही विषयी विचारले असता तो म्हणाला की 'प्रत्येकाला कळायला हवं की कोणत्याही कुटुंबात, मुलं हे नेहमीच त्यांच्या वडिलांप्रमाणे करते. या सगळ्या गोष्टी इतर लोक पसरवतात जे लोक निराश होतात आणि त्यांना हे कळत नाही ते घराणेशाही विषयी बोलतात. त्यांना कळत नाही की ती व्यक्ती एक वडील आहे आणि ती व्यक्ती त्याच्या मुलासाठी करत आहे. कोणतं कुटुंब आहे जे असं नाही करत? आणि ज्यांना त्यांच्या मुलासाठी करायचं आहे, तर त्यात चुकीचं काय आहे? पण यशस्वी तोच असतो जो पुढे स्वत: जातो.' 



सनी पुढे म्हणाले, 'माझ्या वडिलांची इच्छा नव्हती की मी अभिनेता व्हावे, त्यांनी त्यांच्या मुलाला अभिनेता होण्याविषयी विचार करु शकत नव्हतो... वडील इतके मोठे दिग्गज कलाकार आहेत आणि मी स्वत: माझी ओळख बनवली आणि आज मी इथे आहे. मी माझ्या वडिलांप्रमाणे नाही आहे, पण आमच्यात बऱ्याच गोष्टीमध्ये साम्य आहे.' 


हेही वाचा : बिपाशाच्या लेकीच्या हृदयात दोन छिद्रे, तीन महिन्याची देवी ऑपरेशन थिएटरमध्ये जगण्यासाठी देत होती झुंज


सनी देओलविषयी बोलायचे झाले तर तो आता 'गदर 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तर त्याच्या खासगी आयुष्यामुळे बोलायचे झाले तर सनीला दोन मुलं आहेत. एका मुलाचे नाव करण देओल आणि राजवीर देओल असं आहे. करण देओलनं पल पल दिल के पास या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट 2019 साली प्रदर्शित झाला होता. तर त्याचा दुसरा मुलगा राजवीर देओल हा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून दोनो या चित्रपटात तो दिसणार आहे.