बिपाशाच्या लेकीच्या हृदयात दोन छिद्रे, तीन महिन्याची देवी ऑपरेशन थिएटरमध्ये जगण्यासाठी देत होती झुंज

Bipasha Basu's Daughter : बिपाशा बासूनं गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात लेकीला जन्म दिला. तिच्या जन्माच्या तीन दिवसात कळलं की तिच्या हृदयात दोन छिद्रे आहेत. त्यानंतर त्यांचा किती कठीण प्रवास होता याविषयी बिपाशाना यावेळी सांगितलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 6, 2023, 11:03 AM IST
बिपाशाच्या लेकीच्या हृदयात दोन छिद्रे, तीन महिन्याची देवी ऑपरेशन थिएटरमध्ये जगण्यासाठी देत होती झुंज title=
(Photo Credit : Social Media)

Bipasha Basu's Daughter : बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर यांनी गेल्या वर्षी त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत केले. बिपाशानं 22 नोव्हेंबर 2022 रोजी तिच्या मुलीला जन्म दिला असून तिचं नावं त्यांनी देवी असं ठेवलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत याची माहिती सगळ्यांना दिली होती. जवळपास 8-9 महिन्यांनंतर बिपाशानं तिच्या लेकीच्या आरोग्याविषयी एक अपडेट शेअर केली आहे. बिपाशा म्हणाली की जेव्हा देवीचा जन्म झाला तेव्हा तिला वेंट्रिकुलर सेप्टल डिफेक्ट (VSD) नं त्रस्त असल्याचे कळले. बिपाशानं एका लाइव्हमध्ये याविषयी सांगितले. 

बिपाशानं याविषयी अभिनेत्री नेहा धुपियासोबत असलेल्या इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये तिच्या मुलीच्या हृदयात दोन छिद्रे असल्याचे सांगितले आणि देवी तीन महिन्यांची असताना तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली हे देखील सांगितले. बिपाशा, करण आणि त्यांची लेक देवीच्या प्रवासाविषयी तिनं थोडक्यात या मुलाखतीत सांगितलं आहे. हा संपूर्ण प्रवास सांगत बिपाशा म्हणाली, 'कोणत्याही नॉर्मल आई-वडिलांपेक्षा आमचा प्रवास खूप वेगळा होतो. माझ्या चेहऱ्यावर आता जे हसू आहे त्यापेक्षा ते हसू खूप वेगळं होतं. आमच्यासाठी तो काळ खूप कठीण होता. माझ्या मुलीच्या जन्माच्या तीन दिवसांनंतर मला कळलं की तिच्या हृदयात छिद्रे आहेत. मला वाटलं होतं की मी हे कधीच सांगणार नाही. पण मी आता हे सगळ्यांना सांगते त्याचं कारण म्हणजे मला असं वाटतं की अशा अनेक आई आहेत, ज्यांनी यात माझी मदत केली आणि त्या आईंना शोधणं खूप महत्त्वाचं आहे.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे बिपाशा म्हणाली की 'आम्हाला हे देखील कळलं नाही की वीएसडी काय आहे. हा वेंट्रिकुलर सेप्टल आहे. आम्ही तेव्हा या सगळ्या तणावात वेडे झालो होतो. आम्ही याविषयी आमच्या कुटुंबाशी चर्चा केली नाही. आम्ही दोघेही घाबरलो होतो. मी आणि करण तर सुन्न पडलो होतो. सुरुवातीचे पाच महिने आमच्यासाठी फार कठीण होते. पण देवी पहिल्या दिवसापासून स्ट्रॉंग होती. आम्हाला सांगितलं होतं की प्रत्येक महिन्याला एक स्कॅन करावा लागेल आणि त्या स्कॅनमध्ये कळेल की ती स्वत: हून ठीक होतेय का. पण ज्या प्रकारे ते छिद्र मोठं होतं, आम्हाला सांगितलं होतं की हे खूप धोकादायक आहे, तुम्हाला सर्जरी करावीच लागेल. त्यातही सर्जरी करणं तेव्हाच योग्य असतं जेव्हा बाळ हे तीन महिन्याचं होतं.' 

बिपाशा पुढे रडत म्हणाली की तुम्ही इतके दु:खी असतात आणि काही कळत नसतं, कारण तुम्ही एका बाळाची ओपन हार्ट सर्जरी कशी करू शकतात? आम्ही विचार करतो की आपण विचार करतो की आपोआप ठीक होईल. मला आठवतं तिसरा महिना होता, जेव्हा आम्ही स्कॅनसाठी गेलो, सर्जनला भेटलो, हॉस्पिटलमध्ये गेलो, डॉक्टरांशी बोललो आणि मी तयार होते, करण नव्हता. मला माहित होते की ती ठीक आहे आणि मला माहित आहे की ती ठीक होईल. आता ती बरी आहे. पण माझ्या मुलीवर योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी शस्त्रक्रिया कशी करायची, ही अडचण होती.'

हेही वाचा : ‘लप्पू सा सचिन… झींगुर सा लडका’, सीमा आणि सचिनच्या लव्ह स्टोरीवर यशराज मुखातेचं धमाल गाणं

बिपाशा तिच्या मुलीच्या ऑपरेशनविषयी बोलताना म्हणाली की देवी तीन महिन्याची असताना तिची सर्जरी झाली आणि ऑपरेशन सहा तास सुरु होतं. ती जितका वेळ आत होती तितका वेळ आमचं जग जसं थांबलं होतं. बिपाशानं सांगितलं की तिला खूप चिंता वाटतं होती पण तिच्या मुलीची सर्जरी यशस्वी होती. देवी आता ठीक आहे.