मुंबई  : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी तिच्या फिटनेसची विशेष काळजी घेते. अनेकदा वर्कआउट्स करताना तिचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मिडियावर व्हायरल होतात. सनी लिओनी खास डाईट आणि वर्काऊटच्या सहाय्याने खूप तंदुरुस्त राहते. पण तुम्हाला माहिती आहे का? की, फिटनेसबरोबरच सनी लिओनीचा स्टॅमिनासुद्धा आश्चर्यकारक आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये सनी लिओन मुंबईच्या रस्त्यावर सायकल चालवताना दिसत आहे. तिच्यासोबत तिचा पती डॅनियल वेबर देखील आहे. सनी लिऑनच्या बाजूला फिरणारा पापाराजी सनी लिओनीला आवाज देतो, त्यानंतर सनी त्याच्याकडे पाहते, त्यानंतर फोटोग्राफर सनी लिओनला सायकल थोडी हळू चालवण्यास सांगतो.



सनीने सगळ्यांना सोडलं मागे 
खट्याळ सनी लिओनीने लगेच तिच्या सायकलचा वेग वाढवला आणि जवळ बाईक चालवणाऱ्या या फोटोग्राफरच्या बाईकला मागे टाकलं. हे पाहून फोटोग्राफरही हसले आणि त्याने सनी लिओनीचा पती डॅनियल वेबरकडे कॅमेरा फिरवला. यानंतर फोटोग्राफ पुन्हा सनी लिओनीकडे पोहोचले तेव्हा सनी त्यांच्याकडे बघून हसू लागते.


फिटनेस आणि सोशल डिस्टंसिंग
सनी लिओन पापाराझीला समोर रस्त्याकडे बघून गाडी चालवायला सांगते आणि नंतर ती मास्क घालून पुढे जाते. नंतर जेव्हा ती पुढे जाऊन थांबते तेव्हा फोटोग्राफरला ती आपले फोटो काढू देते. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. पापराजी वायरल बयानीने हा व्हिडिओ शेअर केला आहे.