Zapatlela Completes 30 Years Today: 'ओम फट स्वाहा...' हा तात्या विंचूचा मंत्र ऐकला की आपल्यालाही 'झपाटलेला' (Zapatlela) चित्रपटाचे ते जूने दिवस आठवले असतील. तात्या विंचूनं अनेकांचे बालपण हे सुखदायी केलं आहे आणि त्याचे क्षेय जाते ज्येष्ठ अभिनेते-निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे (Mahesh Kothare) आणि तात्या विंचू (Tatya Vinchu) अजरामर करणाऱ्या शब्दभ्रमकार रामदास पाध्ये यांना. ज्यांनी तात्या विंचू हे पात्र आपल्या समोर अक्षरक्ष: जिवंत केलं. आज तुमच्या आमच्या लाडक्या तात्या विंचूला 30 वर्ष पूर्ण होत आहेत. तात्या विंचू 30 वर्षांचा झाला आहे. ज्यांनी हा बाहुला साकार केला ते रामदास पाध्ये अनेकदा तात्या विंचूबद्दलच्या आठवणी सांगतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज 16 एप्रिलला झपाटेलल्या या चित्रपटाला 30 वर्षे पुर्ण झाली आहे. यानिमित्तानं रामदास पाध्ये यांचे चिरंजीव सत्यजित पाध्ये (Satyajit Padhye Facebook Post) यांनी एक फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. यावेळी त्यांनी झपाटलेल्या चित्रपटाचे जूने फोटो आणि पडद्यामागील काही न पाहिलेले फोटो हे शेअर केले आहेत. या फेसबुक पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स अक्षरक्ष: पाऊस पडला आहे. (superhit marathi movie zapatlela completes 30 years today satyajit padhye shares old memories on facebook)


काय म्हटलंय पोस्टमध्ये


सत्यजितनं या पोस्टमध्ये म्हटलंय की, 


''30 वर्ष... हो.. झपाटलेला ह्या सिनेमाला आज 30 वर्ष पूर्ण होत आहेत. 16 एप्रिल 1993 ह्या दिवशी हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि तुम्ही सर्वांनी त्याला आयकॉनिक बनवला...
तात्या विंचू हे पात्र सुद्धा भारतीय व मराठी सिनेमा च्या इतिहासातल एक अविभाज्य घटक बनलं. 
आज 2023 साल आहे आणि आमच्या तात्या विंचूची लोकप्रियता प्रत्येक वर्षात वाढतच आहे. सोशल मीडियाच्या युगात आज त्याच्यावर अनेक memes बनत आहेत. सगळ्यात आशर्याची गोष्ट म्हणजे, जी मुलं 1993 ला जन्माला सुद्धा आली नव्हती, त्यांना सुद्धा आमचा तात्या विंचू आवडतो. 
या निमित्ताने, आम्ही (झापटेला आणि झापटेला -2 ची संपूर्ण टीम) आमच्या लाखो चाहत्यांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी हे घडवून आणले. आमच्या तात्या विंचूवर असेच प्रेम करत रहा. 
ह्या निमित्याने, झापतलेला ह्या सिनेमाची काही पडद्यामागची छायाचित्रे आम्ही शेअर करत आहोत.'' असं सत्यजितनं पोस्टमध्ये म्हटलं आहे. 


हेही वाचा - Motion Sickness: लांबच्या प्रवासात, घाटातून जाताना गाडी लागते? 'हे' घरगुती उपाय ठरतील फायदेशीर



अजरामर चित्रपट 


या चित्रपटात सगळ्यात लक्षात राहिलेली भुमिका म्हणजे ज्येष्ठ अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांची. त्यांची लक्ष्या ही व्यक्तिरेखा आजही प्रचंड लोकप्रिय झाली. आजही प्रेक्षक हा चित्रपट आवडीनं फक्त त्यांच्यासाठी पाहतात. यासोबत ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश कोठारे, किशोरी आंबिये यांच्याही भुमिका प्रचंड गाजल्या होत्या. या चित्रपटाचा दुसरा भागही 2013 (Zapatlela 2) साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात आदिनाथ कोठारे आणि सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख भुमिका होत्या. हे फोटो पाहून तुमच्याही झपाटलेल्याच्या आठवणी त्याच्या झाल्याशिवाय राहणार नाहीत.