Rashmika Mandanna: नॅशनल क्रश रश्मिकाची 80 लाख रुपयांना फसवणूक, `या` व्यक्तीने केला घात!
Rashmika Mandanna News: रश्मिकाची 80 लाख रुपयांची फसवणूक केल्याची माहिती समोर येत आहे. कोणी बाहेरच्या नव्हे तर जवळच्या व्यक्तीने तिची फसवणूक केल्याचं दिसल्याने सर्वांचा पारा चढल्याचं दिसून येतंय.
Rashmika Mandanna: दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री आणि ऑल टाईम नॅशनल क्रश रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) तिच्या घायाळ करणाऱ्या अदांमुळे चर्चेचा विषय असते. रश्मिका मंदाना शेवटची हिंदी थ्रिलर 'मिशन मजनू' या चित्रपटामध्ये (Rashmika Mandanna Movie) दिसली होती. अशातच सध्या ती आगामी ‘पुष्पा 2’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्थ असल्याचं दिसतंय. अशातच आता रश्मिकाची 80 लाख रुपयांची फसवणूक केल्याची माहिती समोर येत आहे. कोणी बाहेरच्या नव्हे तर जवळच्या व्यक्तीने तिची फसवणूक केल्याचं दिसल्याने सर्वांचा पारा चढल्याचं दिसून येतंय.
रश्मिकासोबत खूप काळ काम करणाऱ्या मॅनेजरने तिची तब्बल 80 लाखांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रश्मिका मंदानाने तिच्या मॅनेजरला (Rashmika Mandanna Manager) ताबडतोब काढून टाकलं. रश्मिकाच्या सुरूवातीच्या करियरपासून ही मॅनेजर तिच्यासोबत काम करत होती. मात्र, काही काळानंतर निती फिरली आणि मॅनेजरने गडबड घोटाळा केला. त्यानंतर रश्मिका मंदानाने स्ट्रिक्ट अॅक्शन घेतलीये.
अभिनेत्री रश्मिका मंदानाला या प्रकरणाचा कोणत्याही प्रकारे गाजावाजा करायचा नव्हता. म्हणून, रश्मिकाने आपल्या मॅनेजरला काढून टाकलं आणि इतर सर्व गोष्टी स्वतः हाताळल्याची माहिती पिंकविलाने दिली आहे. मॅनेजरवर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचं मत नेटकऱ्यांनी नोंदवलं आहे.
दरम्यान, संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ॲनिमल या चित्रपटातून रश्मिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रश्मिका नेहमी तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. विजय देवरकोंडाशी तिचं नेहमीच नाव जोडलं जातं. मात्र, दोघांनी अद्याप त्यांच्या नात्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. विजयची आवडती अंगठी रश्मिकाच्या हातात असल्याने दोघांच्या नावाची जोरदार चर्चा झाली होती. दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना ही नॅशनल क्रश म्हणूनही ओळखली जाते. तिच्या अभिनय आणि सौंदर्यामुळे ती लाखो हृदयांवर राज्य करते. या अभिनेत्रीची फॅन फॉलोइंग केवळ दाक्षिणात्यच नाही तर हिंदी चित्रपटातही चाहते मोठ्या संख्येने आहेत.