मुंबई : बॉलिवुडचा सुपरस्टार सलमान खान गेल्या काही दिवसांपासून 'भारत' या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. दिग्दर्शक अली अब्बास जफरने दिलेल्या माहितीनुसार सिनेमाचं शुटिंग हे आता शेवटच्या टप्यात आहे. हा सिनेमा यंदा ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. सिनेमातील व्यस्त शेड्युलमधून थोडा वेळ काढून सलमान खान आपली खासगी काम देखील करत आहे. असंच एक महत्वाचं काम करतानाचा सलमान खानचा व्हिडिओ वायरल झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



सलमान खान बीइंग ह्यूमनप्रमाणेच बीइंग स्ट्राँग नावाने फिटनेस इक्यूपमेंट्स प्रमोट करत असतो. सलमान खान शुक्रवारी मुंबईतील एका इव्हेंटमध्ये पोहोचला. यावेळी सलमान खानने असं काही केलं की सगळेच थक्क झालं. सलमान खानने त्या जिममध्ये अशा काही अंदाजात बेंच प्रेस केले की सगळे बघतच राहिले. सलमान खानने एक दोन नव्हे तब्बल 70 हून अधिक वेळा बेंच प्रेस केले. हा व्हिडिओ सलमान खानने आपल्या इंस्टा अकाऊंटवर शेअर केला आहे. तसेच एक महत्वाचा मॅसेज देखील लिहिला आहे की, रोज करत असाल तर करा.... अन्यथा ट्रेनरच्या मदतीशिवाय याचा प्रयत्न देखील करू नका. सलमान खानचा हा व्हिडिओ इंटरनेटवर खूप वायरल झाला आहे. या व्हिडिओत त्याच्यासोबत मैत्रिण लूलिया वंतूर आणि भाऊ अरबाज खान देखील उपस्थित आहे. 


सलमान खान आपल्या फिटनेसबाबत किती लोकप्रिय आहे हे सगळेच जाणतो. वयाची पन्नाशी उलटूनही सलमान खान आज फिट आहे. त्याचा फिटनेस आताच्या अभिनेत्याला देखील लाजवेल असा आहे. त्याच्या फिटनेसमुळे अनेक मुली सलमान खानचे चाहते आहेत.