मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्याविषयी प्रचंड चर्चा सुरु झाली आहे. यामध्ये सुशांतची एक गोष्ट सर्वाधिक लक्ष वेधून घेताना दिसत आहे. सुशांतला अंतराळ आणि ग्रह, ताऱ्यांबाबत विशेष रुची होती. २०१८ साली त्याने चंद्रावर एक प्लॉटही खरेदी केला होता. चंद्रावरील 'सी ऑफ मसकोवी' या भागात हा प्लॉट आहे. एवढेच नव्हे तर हा प्लॉट पाहण्यासाठी सुशांतने 14LX00 हा महागडा टेलिस्कोपही (दुर्बीण) खरेदी केला होता. सुशांतने सोशल मीडियावर याविषयी चाहत्यांना सांगितलेही होते. याशिवाय, सुशांतकडे स्वत:च्या मालकीचे फ्लाईट स्टिम्युलेटर flight simulator होते. वैमानिकांना आभासी प्रशिक्षण देण्यासाठी flight simulator चा वापर केला जातो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

...म्हणून सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली का? धक्कादायक खुलासा

तसेच सुशांत सिंह राजपूतकडे मसेराटी क्वाट्रोपोट्रो Maserati Quattroporte आणि BMW K 1300 R ही महागडी मोटारसायकलही होती. यापैकी कारची किंमत साधारण दीड कोटी इतकी आहे. तर मोटारसायकलची किंमत २५ लाख इतकी आहे. तसेच सुशांतने २०१५मध्ये पाली हिल येथे एक पेंटहाऊसही खरेदी केले होते. साधारण २० कोटी रुपयांना त्याने हे पेंटहाऊस विकत घेतले होते. याठिकाणीही अनेक मौल्यवान आणि उंची वस्तू असल्याचे सांगितले जाते.


सुशांतच्या आत्महत्येची बातमी कळताच अंकिता लोखंडे म्हणाली...


दरम्यान, सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या त्याचा मृतदेह मुंबईच्या कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. त्याच्या आत्महत्येच्या कारणांविषयी अनेक उलटसूलट चर्चा सुरु आहेत.