सुशांतच्या आत्महत्येची बातमी कळताच अंकिता लोखंडे म्हणाली...

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण बॉलीवूडला धक्का बसला आहे.

Updated: Jun 14, 2020, 05:32 PM IST
सुशांतच्या आत्महत्येची बातमी कळताच अंकिता लोखंडे म्हणाली... title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण बॉलीवूडला धक्का बसला आहे. वांद्राच्या घरामध्ये सुशांतसिंग राजपूतने गळफास लावून आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येची बातमी कळताच अभिनेत्री अंकिता लोखंडेलाही धक्का बसला. एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना अंकिता लोखंडेने फक्त 'काय' हा एकच शब्द उच्चारला. यानंतर अंकिता लोखंडेने फोन ठेवून दिला. 

झी टीव्हीच्या पवित्र रिश्ता या मालिकेतून सुशांत आणि अंकिताची जोडी लोकप्रिय झााली होती. बराच कालावधी सुशांत आणि अंकिता रिलेशनशीपमध्ये होते, पण या दोघांचं ब्रेक अप झालं होतं. 

Zee TV च्या 'या' मालिकेमुळे सुशांत सिंह झाला होता लोकप्रिय

सुशांतसिंगला पंख्याला लटकलेलं पाहून त्याच्या नोकराने पोलिसांना बोलावलं. वांद्रे पोलीस सध्या सुशांतच्या आत्महत्येची चौकशी करत आहेत. सुशांतच्या घरामध्ये पोलिसांना चिठ्ठी सापडलेली नाही. आत्महत्येवेळी सुशांत हा घरात एकटा नव्हता, तर त्याचे काही मित्रही होते. पोलिसांना सुशांतच्या घरात काही कागदपत्रही सापडली आहेत. गेल्या काही काळापासून सुशांत डिप्रेशनमध्ये होता. त्यामुळेच त्याने आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. 

काहीच दिवसांपूर्वी सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियननेही आत्महत्या केली होती. 

...म्हणून सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली का? धक्कादायक खुलासा