मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) पुन्हा एकदा ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे. यावेळी सुष्मिताजी भूमिका साकारते त्या विषयी जाणून घेऊया. खरंतर, सुष्मिता 'ताली' (Taali)  या नवीन सीरिजमध्ये दिसणार आहे. या सीरिजमध्ये सुष्मिता ही फस्ट लूक समोर आला आहे. सुष्मितानं तिचा हा फस्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. 


आणखी वाचा : 'लैंगिक अत्याचार करणाऱ्यांचं...', 'बिग बॉस'मध्ये साजिद खानला पाहून संतापली उर्फी जावेद


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुष्मितानं हा लूक तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. यावेळी सुष्मिता ही ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे. हा फोटो शेअर करत सुष्मिता म्हणाली, 'मी टाळ्या वाजवणार नाही, #first #ShreegauriSawant' सुष्मितानं शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं लाल-हिरव्या रंगाची साडी नेसली असून कपाळावर मोठी बिंदी, लाल लिपस्कर्ट लावली असून, टाळ्या वाजवत दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर राग दिसतोय. दरम्यान, ही वेब सीरिज ट्रान्सजेंडर कार्यकर्ती गौरी सावंत (Gauri Sawant) यांच्या जीवनावर आधारित आहे. वेब सीरिजमध्ये सुष्मिता गौरीची भूमिका साकारत असून आता गौरीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची संधी सर्वांना मिळणार आहे.


आणखी वाचा : करिअरच्या शिखरावर अभिनेत्यानं का घेतला आश्रमात टॉयलेट साफ करण्याचा निर्णय?



आणखी वाचा : फॅशनच्या चक्करमध्ये प्रियांका झाली Oops Moment ची शिकार, पाहा फोटो


सुष्मितानं 'आर्य' वेब सीरिजमधून अभिनय क्षेत्रात पुनरागमन केलं. 'आर्या'चे दोन्ही सीझन प्रेक्षकांना प्रचंड आवडले. आता या सीरिजचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले जात आहे. याआधी सुष्मितानं तिच्या नवीन वेब सिरीज 'ताली'बद्दल लोकांना माहिती दिली होती. फोटो शेअर करत तिनं लिहिलं होतं की, 'मला एका सुंदर व्यक्तीचे आयुष्य चित्रित करण्याची संधी मिळत आहे आणि यापेक्षा भाग्यवान काहीही असू शकत नाही. हे जीवन आहे आणि प्रत्येकाला ते सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. ही वेब सीरीज ट्रान्सजेंडर अॅक्टिव्हिस्ट गौरी सावंत यांचा बायोपिक आहे.'


आणखी वाचा : 'विमानात केली मारहाण, मुलाचाही दाबला गळा...,' 'या' प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीनं केले धक्कादायक आरोप


मीडिया रिपोर्ट्सनुसार, या वेब सीरिजच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. वेब सिरीजचे दिग्दर्शक मराठी चित्रपट निर्माता रवी जाधव आहेत. या वेब सिरीजचे स्ट्रीमिंग व्हूट या प्लॅटफॉर्मवर केले जाणार असल्याचे म्हटले जात आहे. ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेनमेंट आणि मीडिया सोल्युशन्सच्या बॅनरखाली ही वेब सिरीज तयार केली जात आहे. अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी निशानदार यांनी या सीरिजची निर्मिती केली आहे. रिपोर्ट्सनुसार, या सीरिजचे 6 एपिसोड्स असणार आहेत. त्याचबरोबर गौरीच्या आयुष्यातील प्रत्येक पैलू दाखवण्याचा प्रयत्न या सीरिजमध्ये केला जाईल जेणेकरून प्रेक्षकांना तिच्याबद्दल थोडक्यात माहिती मिळेल. गौरी सावंत ही भारताची पहिली ट्रान्सजेंडर आई कशी बनली हे विशेषत: प्रकाश टाकेल.