Swara Bhaskar and Fahad Ahmad :  बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) हिनं आपला प्रियकर समाजवादी पार्टीचा युवा नेता फहाद अहमद (Swara Bhaskar and Fahad Ahmad) यांच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. सध्या त्या दोघांच्या तूफान चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत. अनेक लोक त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. आता स्वरा भास्करनं एएमयू (AMU) मध्ये लग्नाची पार्टी देण्यावर विद्यार्थांमध्ये वाद वाढला आहे. माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष म्हणाले की स्वरा भास्करने CAA/NRC बाबत भारतातील मुस्लिमांची दिशाभूल केली आहे. हे लोक तुकडे-तुकडे गॅंगचे आहेत. त्यांना आता एएमयूमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी असलेल्या मोहम्मद फहादसोबत अभिनेत्री स्वरा भास्करच्या लग्नाच्या चर्चा सध्या जोरात सुरू आहेत. दरम्यान, अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष फैजुल हसन यांनी नवविवाहित जोडप्याला अलीगड मुस्लिम विद्यापीठात येण्याचे निमंत्रण दिले आहे. मात्र, आता यावरून विद्यार्थ्यांमध्ये वाद वाढत असल्याचे दिसून येत आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


विद्यार्थी संघटनेचे माजी उपाध्यक्ष नदीम अन्सारी याविषयी म्हणाले की, ते लोक स्वरा भास्करला अलीगढ मुस्लिम विद्यापीठात येऊ देणार नाहीत. विद्यापीठाचे प्रशासन स्वरा भास्कर आणि तिच्या पतीला अधिकृतपणे आमंत्रित करत नाही. राजकारण करण्यासाठी हे वक्तव्य करण्यात आले आहे. नदीम अन्सारी म्हणाले की स्वरा भास्करने CAA/NRC दरम्यान देशातील मुस्लिमांची दिशाभूल करण्याचे काम केले होते.


नदीम अन्सारी म्हणाले की, विद्यापीठाने एएमयूमध्ये येण्याचे निमंत्रण कोणालाही दिलेले नाही. विद्यापीठ कुणाला निमंत्रण का पाठवेल? स्वरा भास्कर आणि फहादचे लग्न झाले आहे. ही त्याची वैयक्तिक बाब आहे. माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष फैजुल हसन यांनी आपले राजकारण करण्यासाठी तिला लग्नानंतर विद्यापीठात येण्याचे निमंत्रण देत असल्याचे वक्तव्य केले होते. आम्ही स्वरा भास्करला एएमयूमध्ये येऊ देणार नाही.


हेही वाचा : Akshay Kumar च्या बॉडीगार्डनं चाहत्याला धक्का देताच... Video पाहून तुम्हाला बसेल धक्का


दरम्यान, 15 दिवसांपूर्वी स्वरानं फहादसोबतचा एक फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तो फोटो शेअर करत स्वरानं  कॅप्शन देत म्हणाली की, “जन्मदिनाच्या शुभेच्छा फहद मिया. भाईचा आत्मविश्वास असाच कायम राहो. आनंदी राहा आणि असंच काम करत राहा. आता वय वाढत चाललंय, लग्न करा. तुझा वाढदिवस आणि हे संपूर्ण वर्ष तुझ्यासाठी चांगलं जाओ मित्रा.” त्यावर स्वराला उत्तर देत फहाद म्हणाला होता की “धन्यवाद जरनवाजी मैत्रिणी. भावाच्या आत्मविश्वासाने झेंडा उंचावला आहे, तो अबाधित राहणे आवश्यक आहे आणि हो, तू माझ्या लग्नाला येशील असे वचन दिले होते, त्यामुळे वेळ काढा, मला मुलगी सापडली आहे.”च्या आरोग्यावर आणि शरीरावर चांगले फायदे देऊ शकते.