Gul Palang on Bollywood Actresses Political Entry: बॉलीवूडमधील अनेक तारेतारका यांनी राजकारणातही प्रवेश केला आहे. जया बच्चन, उर्मिला मातोंडकर, शत्रुघ्न सिन्हा, नुसरत जहाँ, गोंविदा, अमिताभ बच्चन, (Amitabh Bachchan in Politics) हेमा मालिनी अशी काही नावं घेता येतील. आताच्या नव्या पिढीतही अनेक बॉलीवूड तसेच टेलिव्हिजन कलाकारही राजकारणात प्रवेश करत आहेत आणि आपलं कर्तृत्व गाजवत आहेत. सध्या कंगना राणावतच्या राजकीय प्रवेशावर (Kangana Ranaut Political Entry) विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातून ती खरंच राजकारणात प्रवेश करणार की नाही यावर अद्यापही कोणतंच ठाम मतं नाही. (Taapsi Pannu gulpanag kangana ranaut Become part of politics)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण आता कंगानाच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चा सुरू होत असताना आता अजून एका अभिनेत्रीनं वेगळाच खुलासा केला आहे. तिच्या या वक्तव्यामुळं सध्या सगळीकडेच जोरजोरात चर्चा सुरू झाली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गुल पनाग (Gul Panag) या लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्रीनं एक भविष्यवाणी केली आहे. तिच्यामते दोन लोकप्रिय बॉलीवूडच्या अभिनेत्री राजकारणात येणार असल्याचे वक्तव्य तिनं केले आहे. 


आणखी वाचा - खिशात पैसे नाहीत म्हणून रेल्वेच्या शौचालयात लपून बसायचा 'हा' लोकप्रिय गायक


तुम्हाला हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसला असेल तेव्हा जाणून घेऊया नक्की या अभिनेत्रीचं म्हणणं काय आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत तिला प्रश्न विचारण्यात आला की यंदाच्या अभिनेत्रींनीपैंकी अशा कोणत्या अभिनेत्री आहेत ज्या राजकारणात येऊ शकतात. तेव्हा अभिनेत्री गुल पनागनं या प्रश्नावर आपली ठाम मतं मांडली. ती म्हणाली की, ''मला आताच्या अभिनेत्रींमध्ये कंगना राणावत आणि तापसी पन्नू (Taapsee Pannu) वाटतात की त्या राजकारणात येऊ शकतील. त्यांच्यामध्ये ती धमक आहे की त्या राजकारणात येऊन काहीतरी करू शकतील पण मला कुठल्या अभिनेत्यांमध्ये मात्र अशी धमक दिसत नाही. त्याउलट मी म्हणेन की आजच्या अभिनेत्यांनी थोडं तरी या अभिनेत्रींकडून शिकलं पाहिजे.''


आणखी वाचा - आई नीतू कपूरनं Ranbir चा फोटो शेअर करतानाच नेटकरी म्हणाले...


कंगनाबद्दल आणखीन खुलासा करताना गुल पनाग म्हणाली की, ''मला तिचं सगळं पटतं असं नाही. मला तिचं बोलणं ऐकून अनेकदा रागही येतो. तुम्हाला असंही वाटतं असेल की तिच्यात खूप बळ आहे, खूप हिमती आणि धाडसी आहे. पण मला मात्र ती जरी या गोष्टींच्या आधारे राजकारणात आली तर मला फार काही आश्चर्य वाटणार नाही.''





गुल पनाग 'गुड बॅड गर्ल' (Good Bad Girl) या आगामी वेब सिरिजमधून दिसणार आहे. अभिषेक गुप्ता यांनी या वेबसिरिजचं दिग्दर्शन केलं आहे. ही सिरिज 14 ऑक्टोबरला रिलिज होणार आहे. या वेबसिरिजमध्ये अनेक लोकप्रिय टीव्ही कलाकारही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 


गुल पनाग या अभिनेत्रीनं ही राजकारणात प्रवेश केला होता. यापुर्वी तिनं 2014 ची चंढीगढ निवडणूक लढवली होती. ही निवडणूक ती हरली होती आणि ज्येष्ठ अभिनेत्री किरण खेर यांनी ही निवडणूक जिंकली होती.