Shailesh Lodha Emotional Post : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील अभिनेता आणि कवी शैलेश लोढावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शैलेश लोढा यांना पितृशोक झाला आहे. शैलेश लोढाचे वडील श्याम सिंह लोढा यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. ते जवळपास दीड महिन्यापासून आजारी होती. शैलेश लोढा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शैलेश लोढा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या वडिलांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत शैलेश लोढानं कॅप्शन दिलं की 'मी जे काही आहे... मी तुमची सावली आहे... आज सकाळी सूर्यप्रकाशानं संपूर्ण जगात प्रकाश आला असला तरी माझ्या आयुष्यात अंधार झाला... वडिलांनी अखेरचा श्वास घेतला. अश्रूंची भाषा असती तर काही लिहू शकलं असत... पुन्हा एकदा बबलू बोलाना...' दरम्यान, आज त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 



भास्करच्या एका रिपोर्टनुसार, श्याम सिंग सोढी यांच्या दोन्ही किडनी या खराब झाल्या होत्या. एका आठवड्यात त्यांच्यावर 3 वेळा डायलसिस करण्यात येत होतं, तर शैलेश लोढा यांनी वडिलांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. वडील श्याम सिंग लोढा यांची कविता लिहिण्यास सुरुवात केली. 


शैलेश लोढानं शेअर केलेली पोस्ट पाहून त्याचे चाहते देखील भावूक झाले आहेत. तर या पोस्टवर 'तारक मेहता' मध्ये मिसेज रोशनची भूमिका साकारणारी जेनिफर मिस्त्रीनं कमेंट करत लिहिलं की ओम शांती, कृपया स्वत: ला सांभाळा. त्यानंतर मिसेस हाथी किंवा कोमल ही भूमिका साकारणाऱ्या अंबिका रंजनकरनं देखील कमेंट करत ओम शांती म्हटलं आहे. 


शैलेश लोढाला तारक मेहता या मालिकेतील तारक या भूमिकेसाठी सगळे ओळखतात. खरंतर 2022 मध्ये बराच काळ सुरु असलेला या शोमधून काढता पाय घेतला. त्याविषयी बोलताना शैलेश लोढा यांनी खुलासा केला की 'असित कुमार मोदी यांनी मला चुकीची वागणूक दिली. ते मी सहन करू शकलो नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पहिल्यांदा घडलं नव्हतं. त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की इथे काम करणारा प्रत्येक व्यक्ती माझा नोकर आहेत.' 


हेही वाचा : एका खोलीत 8 लोकं, संघर्षमय दिवस आठवत बिग बी भावूक... अश्रू थांबेना


शैलेश लोढा यांच्याविषयी बोलायचं झालं तर तो पहिल्यांदा कॉमेडी सर्कसमध्ये दिसला होता. तिथून त्याला खरी ओळख मिळाली होती. त्यांनंतर त्यांनी देखील मागे वळून पाहिलं नाही.