Amitabh Bachchan Got Emotional Talking About His Struggle : 'कौन बनेगा करोडपती' हा शो प्रेक्षकांच्या मनोरंजनासोबत त्यांच्या कामासाठी देखील ओळखला जातो. अमिताभ बच्चन हे नेहमीच हॉटसीटवर असलेल्या स्पर्धकांशी गप्पा मारताना दिसतात. स्पर्धकाला रिलॅक्स वाटावं म्हणून ते त्यांना काही प्रश्न विचारतात आणि स्वत: च्या आयुष्यातील अनेक गोष्टी सांगताना दिसतात. आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये स्ट्रगलच्या दिवसातील काही गोष्टी सांगितल्या. त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे ते एका छोट्या खोलीत 8 लोक एकत्र राहायचे. त्याशिवाय ते जमिनीवर झोपायचे याविषयी देखील त्यांनी सांगितलं आहे.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये स्पर्धक कृष्णाशी अमिताभ बच्चननं विचारलं की ते काय करतात. त्यावर कृष्णानं उत्तर दिलं की ते महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ची तयारी करत आहेत. या दरम्यान, कृष्णानं सांगितलं की कशाप्रकारे पुण्यात ते एका खोलीच्या घरात 8 लोकं राहायचे. कृष्णा यांनी सांगितलेला हा किस्सा ऐकताच अमिताभ यांनी देखील त्यांच्या स्ट्रगलच्या काळातील काही गोष्टी सांगितल्या. त्यांनी सांगितलं की असा काळ होता जेव्हा ते 8 लोकं एका खोलीत राहायचे.
अमिताभ यांनी कृष्णाचं उत्तर ऐकताच सांगितलं की '8 लोकं एका खोलीत? 8 ऐकूण मला इतकं आश्चर्य झालं नाही. जेव्हा मी कॉलेजमधून शिक्षण पूर्ण करून निघालो होतो तेव्हा नोकरीच्या शोधात निघालो होतो. कशी तरी नोकरी मिळाली. त्यावेळी महिन्याला मला 400 रुपये पगार होता. तिथे सुद्धा सर आम्ही जिथे राहत होतो तिथे एका रुममधअये 8 लोकं राहायचो.'
त्यानंतर अमिताभ यांनी सांगितलं की 'या स्ट्रगलमध्ये देखील मज्जा येते. त्यांनी सांगितलं की खूप मज्जा यायची. आम्ही 8 लोकं आणि पलंग 2. जमिनीवर झोपायचो. आम्ही एकत्र आनंदी राहायचो. एकमेकांशी भांडायचो की आज मी इथे झोपणार, कोण पलंगावर झोपणार आणि कोण खाली जमिनीवर झोपणार.'
हेही वाचा : वयाच्या 23 व्या अभिनेत्रीनं केली सर्जरी! ओठांजवळच्या तिळाचीच चर्चा, चाहतेही हैराण
अमिताभ बच्चन हे गेल्या बऱ्याच वर्षांपासून 'कौन बनेगा करोडपती' शोचं सुत्रसंचालन करत आहेत. सध्या या शोचं 16 वं पर्व सुरु आहे. तर हा खेळ रोज चांगलाच रंगत असल्याचं पाहतो. मात्र, अजून शोला त्याला पहिला करोडपती भेटलेला नाही.