मुंबई : तामिळ सिनेमाचे दिग्गज अभिनेते श्रीकांत यांचं निधन झालं आहे.  वयाच्या ८२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्रीकांत यांनी जयललितासोबत 'वेन्निरा अदई'ने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. आणि या सिनिमाने इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीकांत यांचं निधन
श्रीकांच यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण तामिळ इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. फँन्ससोबतच सेलिब्रिटींनी त्यांच्या सोशल मीडिया अकांऊन्टवर पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सुपरस्टार रजनीकांत यांनी श्रीकांत यांच्या निधनाची पोस्ट शेअर करत दुख: व्यक्त केलं आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने त्यांना खूप दुख: झालं आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं की, ''आपला खास मित्र श्रीकांच्या निधनामुळे खूप दुखी आहे. देव त्यांच्या आत्माला शांती देवो.''



४० कलाकारांसोबत केलं काम
४० वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी नायकच नव्हे तर खलनायकाची देखील जबरदस्त भूमिका निभावली. श्रीकांत यांचा पहिला सिनेमा सीवी श्रीधरने दिग्दर्शित केला होता. श्रीकांत यांनी तामिळ इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांसोबत काम केलं होतं. ज्यामध्ये  शिवाजी गणेशन, रजनीकांत आणि कमल हासन सारख्या दिग्गजांच्या नावाचाही सामावेश आहे.