ट्रोलर्सच्या निशाण्यावर तापसी पन्नूचा बॉयफ्रेन्ड; सोशल मीडियावर दिलं सडेतोड उत्तर
ट्रोलर्सला काय म्हणाला तापसीचा बॉयफ्रेन्ड?
मुंबई : अभिनेत्री तापसी पन्नूने नुकताचं स्वतःचं प्रॉडक्शन हाऊस सुरू केला आहे. या आनंदाच्या क्षणी तापसीच्या बॉयफ्रेन्डने तिने आनंद व्यक्त केला. Mathias Boe असं तिच्या बॉयफ्रेन्डचं नाव आहे. गर्लफ्रेन्डच्या आनंदात सहभागी झाल्यामुळे सोशल मीडियावर Mathias Boe ट्रोल केलं आहे. ट्रोलरच्या ट्रोलवर सडेतोड प्रतिक्रिया केल्यामुळे त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रॉडक्शन हाऊस लाँच केल्यानंतर तापसीच्या बॉयफ्रेन्डने कमेन्ट केली की, 'मी मोफत एका चित्रपटात काम करण्यासाठी तयार आहे. जर तुम्ही मला बॉलिवूडमध्ये पाहू इच्छित असाल तर कमेन्ट लाईक करा.' Mathias Boeच्या या कमेन्टनंतर एक युझर म्हणाला, 'कळत नाही तापसी पन्नू Mathias Boe का डेट करत आहे. '
युझर म्हणाला, 'मुली कितीही समजदार असल्यातरी एक वेळ अशी येते की जेथे मुलींना चांगलं आणि वाईटमधलं अंतर कळत नाही. मला असं वाटतं तेव्हाचं तापसी तुला भेटली असेल.' या कमेन्टनंतर Mathias Boe म्हणाला, 'हा मित्रा तू 100 टक्के बरोबर आहे.' यामुळे तापसी सध्या चर्चेत आहे.