मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा हा टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. गेल्या 13 वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमातील सगळ्याच स्टार्स ने आपल्या अभिनयाने लोकांच्या मनात आपलं स्वत:चं स्थान पक्कं केलं आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांनी आपल्या डोक्यावर घेतलं आहे. दिलीप जोशी, मुनमुन दत्ता, मंदार चांदवडकर, सोनालिका जोशी, दिशा वकाणी यांसारखे कलाकार या शोमध्ये मनोरंजक पात्रांमध्ये दिसतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का? की या स्टार्सनी आपल्या या करिअरची कशी सुरुवात केली आणि त्यांनी किती शिक्षण घेतलं आहे? ज्याची माहिती आज आम्ही तुम्हीला देणार आहोत.


दिशा वकानी (Disha Vakani) : पाच वर्षांपासून शोमधून गायब असलेल्या दिशा वाकाणीने दयाबेनच्या पात्राला नवी ओळख दिली. तिची लोकप्रियता एवढी आहे की, शो सोडल्यानंतर आजपर्यंत दुसरं कोणीही तिची जागा घेऊ शकलेलं नाही. दिशाकडे ड्रामाची पदवी घेतली आहे. ज्यामुळे तिला तिचे अभिनय कौशल्य सुधारण्यात खूप मदत मिळाली.


दिलीप जोशी (Dilip Joshi) : दिलीप जोशी या शोमधील सर्वात लोकप्रिय पात्रांपैकी एक असलेल्या जेठालालची भूमिका साकारत आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, दिलीप जोशी यांच्याकडे बीसीए (बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन) ची पदवी आहे. त्यांना इंडियन नॅशनल थिएटरचा सर्वोत्कृष्ट सॉफ्टवेअर अभियंता पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.


मंदार चांदवडकर (Mandar Chandwadkar) : मंदार या शोमध्ये आत्माराम तुकाराम भिडे या शिक्षकाची भूमिका साकारत आहे. शोमध्ये येण्यापूर्वी ते दुबईमध्ये मेकॅनिकल इंजिनियर होते आणि चांगली नोकरीही होते. मंदारने काही हिंदी, मराठी नाटकं केली आणि मग ते तारक मेहता का उल्टा चष्माचा भाग झाले.


मुनमुन दत्ता (Munmun Dutta) : गेल्या 13 वर्षांपासून शोमधून बबिता अय्यरची भूमिका साकारणाऱ्या मुनमुन दत्ताने इंग्रजी साहित्यात म्हणजेच इंग्लिश लिट्रेचरमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे.


सोनालिका जोशी (Sonalika Joshi) : या शोमध्ये सोनालिका भिडे यांच्या पत्नी माधवीची भूमिका साकारत आहे. तिने इतिहास, फॅशन डिझायनिंग आणि थिएटरमध्ये पदवी प्राप्त केली आहे. शोमध्ये सोनालिका लोणची आणि पापड विकताना दाखवण्यात आली आहे.