मुंबई : अभिनेत्री सनी लिओन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा सनी चर्चेचा विषय ठरत आहे. यावेळी चर्चेत येण्यामागचं सनीचं कारण जरा वेगळं आहे. कारण हिंदी सिनेसृष्टी गाजवणारी ही बोल्ड अभिनेत्री आता साऊथ सिनेसृष्टी गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. लवकरच सनीचा एक नवाकोरा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच सनीने तिच्या सोशल मीडियावरुन तिच्या आगामी सिनेमाचं टीझर शेअर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2023 च्या मे मध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिच्या केनेडी या प्रतिभावान चित्रपटात दमदार पदार्पण केल्यानंतर आता सनी एका नव्या तमिळ चित्रपटात दिसणार आहे. " चार्लीच्या " भूमिकेसाठी तिला अनोखं प्रेम मिळालं आणि आता सनी पुन्हा एकदम रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार आहे. केनेडी ने जगभरातील प्रेक्षकांनी मन जिंकली आणि आता सनी नवा कोरा चित्रपट करण्यासाठी सज्ज झाली असून " कोटेशन गँग " या तमिळ चित्रपटात ती दिसणार असल्याची घोषणा तिने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमधून केली आहे. सोशल मीडियावर चित्रपटाचा टीझरसह तिने ही खास गोष्ट तिच्या फॅन्स सोबत शेअर केली आहे. 


अवघ्या काही वेळातच या टीझरला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम प्रेक्षकांनी दिलं आहे. या आधी सनीने बॉलिवूड गाजवलं आहे. सनीच्या या आगामी सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. सनी लिओनीने 10 वर्षांपूर्वी तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. पूजा भट्ट दिग्दर्शित जिस्म 2 मध्ये पदार्पण केल्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये आयटम साँग केलं. तिचं नाव साऊथ इंडस्ट्रीपर्यंत पोहोचलं जिथे तिने चित्रपटांमध्ये विशेष भूमिका साकारल्या. आता सनीला दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतही मुख्य अभिनेत्री म्हणून पाहिलं जातं. लवकरच साऊथ सिनेमात पदार्पण करणार आहे.


चित्रपटाचा टीझर लोकांना प्रचंड आवडला आहे. या चित्रपटात सनी जॅकी श्रॉफसोबत स्क्रीन शेअर करताना दिसत आहे. टीझरमध्ये थ्रिलरचा जबरदस्त डोस पाहायला मिळत आहे. केनेडीच्या भारतात रिलीज होण्याची चित्रपटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, या चित्रपटाच्या घोषणेवरून या अभिनेत्रीच्या चाहत्यांसाठी येणारा काळ एखाद्या ट्रीटपेक्षा कमी नसणार असल्याचं दिसून येतंय.


सुंदर आणि बोल्ड अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर कायम एक्टिव्ह असते. ती तिचे सगळे अपडेट्स सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना देत असते. स्वत:चे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओही ती नेहमी आपल्या सोशल मीडिया अकांऊन्टवरुन शेअर करत असते.   चित्रपट असो किंवा फॅशन शो, सनी तिच्या चाहत्यांना एकापेक्षा एक सरप्राईज देत असते आणि त्यांचे भरपूर मनोरंजन करत असते. आता तिला आगामी साऊथ सिनेमात पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक दिसत आहेत.