The Archies Teaser Out: सुहाना खानचा 'द आर्चिज' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची उत्सुकताही वाढली आहे. दोन वर्षांपुर्वी या चित्रपटाची घोषणा झाली आणि त्यातून ती स्टारकीड्स बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याची माहिती समोर आली. या चित्रपटातून शाहरूख खानची मुलगी सुहाना खान, श्रीदेवी आणि बॉनी कपूरची मुलगी खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगास्त्या नंदा हे तीन बडे स्टारकीड्स या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहेत. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. त्यातून या चित्रपटामुळे पुन्हा घराणेशाहीवरही अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. वर्षभरापुर्वी या चित्रपटाचा पहिला लुक प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'द आर्चिज' ही सिरिज मुळात पाश्चात्त्य आहे. त्याचे फ्रॅन्चाईज आता भारतात आलं आहे. रिव्हरडेल आणि आर्ची यांची ही अजरामर फ्रॅन्चाईज आपल्याला आपल्या येथे पाहायला मिळणार आहे. हा काळ 1964 मधला दाखवण्यात आला आहे. प्रेम, मैत्री, यारी, दोस्ती, ब्रेकअप, पार्टी, मस्ती, मजा, क्लचर, खाद्यसंस्कृती, कपडे, फिरणं, भटकणं, तरूणाई असा सगळा संगम या चित्रपटातून दिसणार आहे असं समोर आलेल्या या चित्रपटाच्या टीझरवरून कळते आहे. 


या सिनेमात सुहाना खान, खुशी कपूर, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा, मिहिर आहूजा, वेदांग रैना, आदिती डॉट आणि युवराज मेंडा हे कलाकार प्रमुख भुमिकेत आहेत. हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. सुहानानं आपल्या इन्टाग्रामवरून आपला हा नव्या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. या पोस्टला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांपासून ते चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. करण जोहरनंही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी सुहाना खाननं कमेंटमध्ये लिहिलं आहे की, ''तेव्हा परत त्या काळात ज्यासाठी सज्ज आहात ना? 'द आर्चिज' मध्ये तुमचं स्वागत!''. सध्या या टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


या चित्रपटाचे दिग्दर्शन हे झोया अख्तर हिनं केलं आहे. जेव्हा या चित्रपटाचा पहिला लुक आला होता तेव्हा या चित्रपटाला या स्टारकीड्सच्या पालकांनी खास शुभेच्छा दिल्या होत्या. त्याच सर्वात जास्त लक्ष वेधलं ते म्हणजे शाहरूख खानच्या पोस्टनं. आपल्या लेकीच्या पदार्पणावर त्यानं खास पोस्टही शेअर केली होती. ज्याची चांगलीच चर्चा रंगली होती.