मुंबई :  अमिताभ बच्चनने बॉलिवूडला खूप हिट सिनेमा दिले आहेत. कुली हा त्यातलाच एक सिनेमा होता. या सिनेमासाठी त्यांचं जगभरातून कौतुकही झालं. या सिनेमात अमिताभ बच्चन यांच्या बालपणीचा रोल निभावणारा छोटा मुलगा तुम्हाला आठवतच असेल. हा मुलगा इंडस्ट्रीमध्ये मास्टर रवीच्या नावाने खूप प्रसिद्ध झाला होता मात्र जस-जसा हा मुलगा मोठा झाला त्याला रवी वलेचा या नावाने ओळख मिळू लागली. रवीने एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमांत बाल कलाकारच्या भूमिकेत काम केलं आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का? एकेकाळी सिनेमातील ओळखला जाणारा चेहरा मास्टर रवी कुठेय आणि काय करतो? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मास्टर रवीने या सिनेमात काम केलं होतं
मास्टर रली ज्याने आता आपलं नाव बजलून रवी वलेचा केलं आहे. १९७७ मध्ये रिलीज झालेला सुपरहिट सिनेमा अमर अकबर एंथोनी मध्ये बाल अमिताभ या भूमिकेत तो दिसला होता. वेगवेगळ्या भाषांमध्ये ३०० पेक्षा अधिक सिनेमात काम केलेला रवी आता ४६ वर्षांचा झाला आहे. त्याने आपल्या करिअरची सुरुवात सिनेमातून केली आहे. मास्टर नटवरलाल आणि बऱ्याच सिनेमात अभिनय केला आहे. रवीने ९० च्या दशकात लोकप्रिय शो 'शांती'चे काही एपिसोडमध्ये देखील काम केलं आहे. 


आता करतोय हे काम
मात्र आज रवी हॉस्पिटॅलिटी मध्ये एक लोकप्रिय नाव आहे. सुत्रानुसार ती त्या मुलांना  व्यक्तित्व विकास आणि इतर कौशल्यांचं प्रशिक्षणही देते. आज ग्लॅमरचं जग सोडून रवी स्वतःचा बिझनेस सुरु केला आहे.


रवी वलेचा मास्टर रवीने केवळ कुलीमध्येच नाही तर 'अमर अकबर एंथनी', 'शक्ति', 'मिस्टर नटरवरलाल', 'फकीरा', 'तुम्हारे बिना', 'खुद्दार', 'नास्तिक', 'परिचय', 'रोटी', 'यादों की बारात', 'कर्ज', 'सीता और गीता' आणि 'देश प्रेमी' सारख्या सिनेमात काम केलं आहे. रवी जेव्हा ४ वर्षांचे होते तेव्हापासून त्यांनी सिनेमासृष्टीत पाऊल ठेवलं तेव्हापासून सगळ्यात जास्त बालकलाकाराचं काम केलं आणि बऱ्याच सिनेमात अमिताभ बच्चनच्या भूमिकेत होता. रवीने आत्तापर्यंत बरेच सुपरहिट सिनेमा दिले आहेत.