And The Oscar Goes too... खऱ्या मानकऱ्यांच्या हाती ऑस्करची चमचमणारी ट्रॉफी
The Elephant Whisperers या माहिती पटाला ऑस्कर 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट माहिती पटाचा पुरस्कार मिळाला. या माहिती पटात हत्तीचं आयुष्य कसं असतं आणि हत्तीचा सांभाळ करणारा महावतचे आयुष्य कसे असते. प्राण्यांचे आणि माणसाचे नाते एका काळानंतर कसे होते हे आपल्याला या माहितीपटात पाहायला मिळाले.
Oscar 2023 The Elephant Whisperers : ऑस्कर 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट माहिती पटाचा पुरस्कार हा 'द एलिफंट व्हिसपर्स' (The Elephant Whisperers) या भारतीय डॉक्युमेंट्रीला मिळाला. या माहिती पटानं ऑस्कर पुरस्कार मिळवणं ही भारतासाठी खूप मोठी गोष्ट होती. ऑस्कर या माहिती पटाला पुरस्कार मिळताच. या माहिती पटात दिसणाऱ्या बोमन आणि बेल्ली हे दोघं आणि त्यांची ही कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्या दोघांनी मिळून कसा हत्तीला सांभाळायचा निर्णय घेतला आणि ते कसा सांभाळ करतात हे पाहायला मिळत आहे. दरम्यान, ऑस्कर मिळाल्यानंतर चित्रपटाची दिग्दर्शिका कार्तिकी गोनसाल्वेस (Kartiki Gonsalves) यांनी बोमन आणि बेल्लीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
कार्तिकी गोनसाल्वेसनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा बोमन आणि बेल्लीचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत बोमन आणि बेल्ली या दोघांनी ऑस्कर पुरस्कार पकडल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करक कार्तिकीनं कॅप्शन दिलं की आम्हाला विभक्त होऊन चार महिने झाले आणि आता मला असं वाटतयं की मी घरी आहे... कार्तिकीनं शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांना बोमन आणि बेल्लीला ऑस्कर पकडताना पाहून आनंद होत असल्याचे सांगितले.
कोण आहेत बोमन आणि बेली?
बोमन आणि बेली हे दोघेही तामिळनाडुच्या मुदुमलाई नॅशनल पार्कमध्ये राहतात. कधी जंगलात राहणाऱ्या प्राण्याचे शिकार करणाऱ्या बोमन यांनी हत्तीची काळजी घेण्याचा म्हणजे हत्तीचा Caretaker होण्याचा निर्णय घेतला. बोमन हा आशियातील सगळ्यात जुना असलेला हत्तीचा कॅम्प थेप्पाकडू एलिफंट कॅम्पमध्ये काम करतो. तर बेल्ली विषयी बोलायचे झाले तर तिला जंगली प्राण्यांची भीती वाटायची कारण तिच्या पहिल्या पतीला वाघानं मारलं होतं. बोमनशी लग्न केल्यानंतर जंगलातील प्राण्यांच्या सानिध्यात राहिल्यामुळे बेल्लीची भीती कमी झाली.
हेही वाचा : साऊथ सुपरस्टार Suriya होणार मुंबईकर? खरेदी केलं इतक्या कोटींचं घर!
2017 पासून बोमननं अनाथ हत्तीच्या पिल्लांचा सांभाळ करण्यास सुरुवात केली. त्यांनी सगळ्यात आधी रघु नावाच्या हत्तीच्या पिल्लाचा सांभाळ केला. त्याला कुटुंबात स्थान दिले आणि त्याच्या थोड्या वर्षांमध्ये त्यांनी अम्मुचा सांभाळ केला. रघु मोठा झाल्यानंतर त्याला दुसऱ्या महावतला देण्यात आले. जेव्हा रघूला दुसऱ्या महावतला देण्यात आले तेव्हा बोमन आणि बेल्लीवर त्याचा काय परिणाम झाला हे पाहणं सगळ्यात जास्त वाईट होतं.