Suriya आणि त्याची पत्नी ज्योतिका हे दोघेही लोकप्रिय दाक्षिणात्य कलाकारांपैकी एक आहे. त्या दोघांचे लाखो चाहते आहेत. सूर्या ाणि ज्योतिकानं त्यांच्या मुलांसाठी हा मोठा निर्णय घेतल्याचे म्हटले जाते. मात्र, नक्की कारण काय किंवा या बातमीवर सूर्या किंवा ज्योतिकानं दुजोरा दिलेला नाही.
Suriya and Wife Jyothika Baught House in Mumbai : दाक्षिणात्य अभिनेता सूर्या (Suriya) आणि त्याची पत्नी अभिनेत्री ज्योतिका (Jyothika) हे लोकप्रिय कपल्सपैकी एक आहेत. सूर्या आणि ज्योतिका त्यांच्या दोन्ही मुलांसोबत बऱ्याचवेळा मुंबईत स्पॉट झाले आहेत. ज्योतिका इथे तिच्या आगामी वेब सीरिजच्या शूटिंगसाठी आली आहे. दरम्यान, आता अशी चर्चा सुरु आहे की सूर्या आणि ज्योतिकानं मुंबईत 70 कोटींचं घर विकत घेतलं आहे. दरम्यान, अशा चर्चा आहेत की सूर्या आणि ज्योतिका त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या करिअरसाठी मुंबईत शिफ्ट झाले आहेत.
काही दिवसांपूर्वी जेव्हा पापाराझींनी सूर्याला मुलांसोबत स्पॉट करण्यात आले होते. त्यावेळी सूर्यानं पापाराझींना विनंती केली की मुलांचे फोटो क्लिक करू नका. सूर्याचं संपूर्ण कुटूंब बऱ्याचवेळा मुंबईत आणि विमानतळावर स्पॉट झाले. त्यामुळे सूर्या हा मुंबईत शिफ्ट झाला अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. रिपोर्ट्सनुसार, सूर्यानं त्याची पत्नी ज्योतिकासोबत मुंबईत 70 कोटी रुपयांचं नवीन घर खरेदी केलं आहे. तर त्यांची मुलं देव आणि दीया यांचे अॅडमिशन मुंबईच्या शाळेत करण्यात आले आहेत. शिवाय ज्योतिकानं हिंदी वेब सीरिज साइन केली आहे.
इतकं सगळं झाल्यामुळे सूर्या आणि ज्योतिकानं मुंबईत घर घेत इथे शिफ्ट होण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जाते. मात्र, या बातमीवर सूर्या किंवा ज्योतिका कोणीही दुजोरा दिलेला नाही. त्या दोघांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर सूर्या सगळ्यात शेवटी आर माधवनच्या (R. Madhavan) 'रॉकेट्री: द नांबी इफेक्ट' या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात सूर्यानं पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.
हेही वाचा : Smriti Irani यांचा 25 वर्षांपूर्वीचा मिस इंडिया रॅंप वॉकचा VIDEO VIRAL
आता सूर्या हा दिग्दर्शक सरुथाई शिवा यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. याशिवाय 'सोरारई पोटरु' या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये देखील तो दिसणार आहे. 'सोरारई पोटरु' या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर सूर्याची पाहुण्या कलाकाराची भूमिका आहे. 42 चे संपूर्ण काम संपल्यानंतर सूर्या Vetri Maaran यांच्या 'वादिवासाल'च्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. ज्योतिकाच्या कामाविषयी बोलायचं झालं तर ती राजकुमार रावसोबत SRI या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण संपल्याचं तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत खुलासा केला होता. याशिवाय ज्योतिकाकडे अनेक प्रोजेक्ट्स देखील आहेत.