हा खरंच फॅमिली शो आहे का? कपिल शर्मा शोमधील विद्या-कपिलच्या संवादावरुन संताप, म्हणाली `लाईट नसताना दोन मुलं...`
The Great Indian Kapil Sharma Show: `भूल भुलैय्या 3` चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी विद्या बालन, कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरी यांनी `द ग्रेट इंडियन कपिल शर्मा` शोमध्ये हजेरी लावली.
The Great Indian Kapil Sharma Show: 'भूल भुलैय्या 3' चित्रपटाच्या निमित्ताने विद्या बालन, कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरी यांनी 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा' शोमध्ये हजेरी लावली. यावेळी नेहमीप्रमाणे हास्याचे अनेक कारंजे उडाले. दरम्यान सुनील ग्रोव्हरने तृप्ती डिमरीला अॅनिमल चित्रपटातील इंटिमेट सीनवरुन प्रश्न विचारल्याने ट्रोल केलं जात आहे. हा एक फॅमिली शो आहे का? अशी विचारणा नेटकरी कर आहेत. यादरम्यान विद्या आणि कपिल शर्मामधील एका संवादावरुनही हीच चर्चा रंगली आहे. विद्या बालन कपिल शर्माची शेजारी असून लॉकडाऊनमध्ये लाईट नेहमी बंद असायची असा टोला तिने लगावला.
कपिल शर्माने विद्या बालनच्या सौंदर्याचं कौतुक करताना म्हटलं की, "तुमच्यासारखी बायको असेल तर नवरा लाईट बंदच ठेवत असेल". यावरुन विद्या बालन आणि कार्तिक आर्यन हसू लागले. कार्तिक आर्यनने या वाक्याचे अनेक अर्थ असल्याचं सांगितलं. त्यावर कपिल शर्माने इतर कोणी पाहू नये यासाठी? असं स्पष्ट केलं.
त्यानंतर विद्या बालन कपिल शर्माला म्हणाली की, "कपिल माझा शेजारी आहे. लॉकडाऊनमध्ये मला कधीच त्याच्या घरात लाईट दिसली नाही. त्यानंतर त्याला दोन मुलं झाली". यानंतर प्रेक्षकांनी हसू अनावर झालं होतं. यावर कपिल शर्मा म्हणाला की, "लोकांच्या घरात वाकून पाहणं चांगलं वाटतं का? विद्याजी तिथे कोणताच शो सुरु नव्हता". त्यावर विद्या बालनने मग तू स्वत:चं मनोरंजन केलंस का? असा प्रश्न विचारला.
अशाच प्रकारे लोकसंख्या वाढली आहे असाही टोला तिने लगावला. त्यावर कपिल शर्माने माझ्या दोघांमुळेच लोकसंख्या वाढली का? अशी विचारणा केली. या कार्यक्रमात दिग्दर्शक अनीस बज्मी आणि अभिनेता राजपाल यादवही उपस्थित होते.
तृप्ती डिमरीला विचारलेल्या प्रश्नावरुन वाद
शोमधील सुनीलचे पात्र डफली रणबीरची कट्टर चाहती दाखवली आहे. डफलीची भूमिका साकारणाऱ्या सुनीलने तृप्तीला विचारलं, ती तीच व्यक्ती आहे का जिने ॲनिमलमध्ये काम केले होतं. जेव्हा ती हो उत्तर देते, तेव्हा डफली त्यांच्या इंटिमेट सीनवर चर्चा करते. या संभाषणादरम्यान तृप्ती थोडी अस्वस्थ दिसली. तृप्तीने उत्तर दिले की, सर्वजण अजूनही त्याच गोष्टीवर अडकले आहेत. यानंतर सुनीलने त्याला विचारलं की हे सीन फक्त रीलपर्यंत आहेत का? यावर तृप्तीने काहीही खरं नाही असं उत्तर दिल.