नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये पुन्हा एकदा जनतेने नरेंद्र मोदी यांना भरघोस मतांनी निवडून दिलं. आज सायंकाळी ७ वाजता मोदी पद आणि गोपनियतेची शपथ घेणार आहेत. या शपथविधीसाठी जवळपास ६ हजार लोकांची हजेरी असणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी देशविदेशातील अनेक मान्यवर दाखल झाले आहेत. यासर्वांसह बॉलिवूड कलाकारही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. अनेक बॉलिवूड अभिनेते, अभिनेत्रींना या सोहळ्यासाठी आमंत्रण देण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार पंतप्रधानांच्या शपथविधि सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहे. 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारा विवेक ओबेरॉयही सोहळ्यासाठी हजर राहणार आहे. कंगना रनौत, कैलाश खेर, राजू श्रीवास्तव, अनुपम खेर, जावेद अख्तर, विकी कौशल, बोमन ईरानी, अनिल कपूर आणि सलीम खान या कलाकारांनाही आमंत्रण देण्यात आलं आहे. 


बॉलिवूड किंग खान शाहरुख, सलमान खान आणि आमिर खान यांना या दिल्लीत होणाऱ्या या सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे. या तीनही खान व्यतिरिक्त रणवीर सिंहला देखील आमंत्रण देण्यात आलं आहे. परंतु रणवीर सध्या त्याच्या आगामी '८३' चित्रपटाच्या शूटिंगसाठी परदेशात असल्याने तो या सोहळ्यासाठी उपस्थित राहू शकणार नसल्याची माहिती मिळत आहे.


याशिवाय बॉलिवूड अभिनेते आणि नवनिर्वाचित खासदार सनी देओल, रवी किशन, मनोज तिवारी हे लोकसभा निवडणुकीत आपापल्या मतदारसंघातून विजयी ठरलेले भाजपाचे उमेदवार देखील मोदींच्या शपथविधि सोहळ्यासाठी उपस्थित असणार आहेत. 


राष्ट्रपती भवनाच्या भव्य प्रांगणात पंतप्रधानांचा शानदार शपथविधि सोहळा होणार आहे. आज दुसऱ्यांदा मोदी शपथ घेणार आहेत. मोदींसह आणखी इतर ६० ते ७० मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. आता या शपथविधिमध्ये इतर कोणकोणते नेते कोणत्या पदासाठी शपथ घेणार हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.