मुंबई : 'द रॉक' या नावाने लोकप्रिय असलेला अभिनेता ड्वेन जॉनसन हा तिसऱ्यांदा वडील झाला आहे. आपल्या गोंडस मुलीचा फोटो रॉकने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत रॉकची गोंडस मुलगी त्याच्या छातीवर शांत असल्याचा हा फोटो आहे. रॉकने मुलीचं नाव टिआना जिया जॉनसन असं ठेवलं आहे. या अगोदर रॉकला दोन मुलं आहे. एकीच नाव जॅस्मिन आणि सिमोन या 2 आणि 16 वर्षाच्या आहेत. 


रॉकला थोडी शंका होती की, रॅम्पेज सिनेमाच्या प्रमोशनमुळे तो पत्नीसोबत डिलिवरीच्या वेळी उपस्थित राहू शकणार नाही. मात्र योग्य वेळी तो पत्नीसोबत उपस्थित होता. आणि याचा त्याला खूप आनंद आहे. रॉकने पत्नीसोबत डिलिवरी रूममधला फोटो देखील शेअर केला आहे. त्याने हा अनुभव इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याने म्हटलं आहे की, मी स्ट्राँग आणि प्रेम करणाऱ्या महिलांसोबत वाढलो आहे. मात्र टिआनाच्या जन्माच्यावेळी लॉरेनबाबत मला जास्त काळजी आणि प्रेम वाटत आहे.