मुंबई : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाची ताऱीख जसजशी जवळ येत आहे, तसतसं या सेलिब्रिटी जोडीच्या लग्नाविषयी उत्सुकता आणखीनचट शिगेला पोहोचत आहे. त्यांची आमंत्रण पत्रिका म्हणू नका किंवा मग लग्नाचं ठिकाण म्हणू नका. सर्वच गोष्टी अगदी खास आणि तितक्याच वेगळ्या असल्याचं कळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्न म्हटलं की विधी, पाहुणेमंडळी, सुंदर कपडे या गोष्टी ओघाओघाने आल्याच. या साऱ्यामध्ये एका गोष्टीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. ती म्हणजे लग्नातील मेजवानी. 


पाहुणेमंडळी आणि लग्नघरातील मंडळींच्या चवी लक्षात घेता लग्नसमारंभांमध्ये मेजवानीवरही विशेष लक्ष देण्यात येतं. रणवीर- दीपिकाच्या लग्नातही ही काळजी घेण्यात आली आहे. 


सूत्रांचा हवाला देत 'बॉलिवूड लाईफ'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार दोन दिवस रंगणाऱ्या विवाहसोहळ्यामध्ये भारतीय आणि कॉन्टिनेंटल अशा दोन्ही पद्धतींच्या खाद्यपदार्थांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. 


दाक्षिणात्य आणि उत्तर भारतीय (सिंधी) अशा दोन पद्धतींनी रणवीर-दीपिका विवाहबद्ध होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक विवाहसोहळ्याच त्या पद्धतीला अनुसरुनच खाद्यपदार्थांचा बेत आखण्यात आला आहे. 


दाक्षिणात्य खाद्यपदार्थांविषयी सांगावं तर पारंपरिक पदार्थांनाही या विवाहसोहळ्यात पसंती देण्यात आली आहे. तर पंजाबी खाद्यपदार्थही तितक्याच रुबाबात पाहुण्याच्या पानात दिसतील यात शंका नाही. 


खास शेफ दीपिका आणि रणवीरच्या लग्नासाठीचे हे पदार्थ बनवणार आहेत. तर, त्यांच्या लग्नाचा केक आणि काही सुरेख असे गोडाचे पदार्थ बनवण्यासाठी स्वित्झर्लंडहून काही खास शेफ येणार असल्याचं कळत आहे.