मुंबईः सध्या बॉलीवूडमधील आणि टॉलीवूडमधील टॉपचे दिग्दर्शक कोणते असा प्रश्न विचारलाच तर उत्तर येईल संजय लीला भन्साळी आणि एस एस राजमौली. या दोन्ही दिग्दर्शकांनी सर्वात महागड्या फिल्म्स केल्या आहेत. बीग बजेट फिल्म्स करणारे सर्वात लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून या दोघांची ओळख आहे. नुकताच एस एस राजमौली यांचा आरआरआर आणि संजय लीला भन्साळी यांचा गंगुबाई काठियावाडी हा चित्रपट रिलिज झाला असून दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरक्षः डोक्यावर घेतले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे दोन्ही भारतीय चित्रपटसृष्टीतील सध्याचे टॉपचे दिग्दर्शक आहेत. अद्यापही हे दोघंही कुठल्या खास कारणासाठी एकमेकांसमोर आलेले नाही. पण आता मात्र हा योग जुळून येणार असल्याची मोठी शक्यता आहे. याला कारणही खास आहे. एरवी आपल्याला चित्रपटांविषयी हे दोघंही दिग्दर्शक स्तुती करताना दिसतात. पण त्यातूनही समोरासमोर या दोघांची भेटगाठ कधी होणार याचीही उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. 


सध्या कॉफी विथ करण हा शो पुन्हा एकदा जोरात चालू आहे त्यामुळे या शोमधून संजय लीला भन्साळी आणि एस एस राजमौली येणार का याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली होती. आता प्रेक्षकांची ही आतूरता करण जोहर पुर्ण करण्याची शक्यता आहे. कारण कॉफी विथ करणच्या पुढच्या एपिसोडमध्ये संजय लीला भन्साळी आणि एस एस राजमौली पाहूणे म्हणून येण्याची दाट शक्यता आहे. 


करण जोहरने अद्याप याबदद्ल जाहीर खुलासा केलेला नाही परंतु लवकरच संजय लीला भन्साळी आणि एस एस राजमौली या शोमध्ये येणार आहेत. तेव्हा या निमित्ताने नक्की काय काय गमती जमती घडतील आणि एकूण कशी मजा येईल. त्या दोघांना नक्की करण जोहर कसे प्रश्न विचारेल याची भयंकर उत्सुकता प्रेक्षकांना आहे. 


लवकरच या एपिसोडच्या प्रोमोची घोषणा केली जाणार आहे. संजय. लीला भन्साळी आणि एस एस राजमौली यांनीही यावर मौन पाळले असून याबद्दल तेही खुलासा करण्याची शक्यता आहे. 


एस एस राजमौली यांनी नुकतीच आमीर खानच्या लाल सिंग चढ्ढा या चित्रपटाच्या स्पेशल शोला भेट दिली होती.