Imraan Hashmi: आजकाल बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये बोल्ड फोटोशूटपासून ते बॉल्ड सिनेमांची एकच चर्चा असते. त्यातून आता बॉलीवूडमध्ये किसींग, सेक्स आणि शिव्या अशा गोष्टीही अत्यंत कॉमन झाल्या आहे. काही लोकं बॉलीवूडवर यामुळेच अत्यंत वाईटरीत्या टीका करतात तर काहीजणांनी बॉलीवूड ही पॉर्न फिल्म इंडस्ट्री झाली आहे इतपतसुद्धा टीका केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओटीटीमुळे बोल्ड सिनेमांना एक रस्ता मिळाला आणि आता अशा सिनेमांचाही मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. 2004 साली आलेल्या 'मर्डर' या चित्रपटाने तेव्हापासून ते आजपर्यंत खूप मोठा प्रेक्षकवर्ग धरून ठेवला आहे. या चित्रपटाची तेव्हा प्रचंड क्रेझ होती जी आजही आहे. त्यावर आजही अनेक मीम्स बनतात आणि सिनेमावर आजही तितकीच चर्चा केली जाते. 


या चित्रपटामुळे मल्लिका शेरावत आणि इम्रान हाश्मी भलतेच लोकप्रिय झाले होते. या चित्रपटापासून इम्रानला सिरियल किसर असा टॅगही पडला. इम्रान हाश्मी त्यानंतर अनेक चित्रपटांमधून दिसला परंतु मल्लिका शेरावत मात्र तिच्या 'हिस्स' या चित्रपटानंतर रूपेरी पडद्यावर फारच कमी दिसली. आता बऱ्याच वर्षांनंतर मल्लिका शेरावत रजत कपूर यांच्या 'RK/RKay' या आगामी चित्रपटातून दिसणार आहे. नुकतीच चित्रपटाची एक झलक प्रेक्षकांसमोर आली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान मल्लिका आणखीन एक खुलासा केला आहे. 


तिला नुकत्याच एका मुलाखतीत विचारण्यात आले की 'मर्डर'चा रिमेक होणार का.. तर त्यावर तिचे उत्तर होते की, ''चाहत्यांना आपलं काम पाहचंय असतं मग ते रिमेकच्या मार्गाने असो वा आणखी काही. मी यापुढे ओटीटीवर अनेक सिनेमे करते आहे. मी चांगल्या स्क्रिप्टच्या यापुढे शोधात राहणार आहे. त्यामुळे तसेच चित्रपट मी करेन आणि त्यांच्या रिमेकमध्ये मला काम करायला आवडेल'', असे उत्तर तिने दिले. 'मर्डर'च्या रिमेकमध्ये तू काम करणार का?, असा प्रश्न विचारल्यावर मल्लिकाने सांगितले की, ''चांगली स्क्रिप्ट तिच्याकडे आली तर चित्रपटात काम करण्यास मी इच्छुक असेन. ''


मल्लिका शेरावत आता 'RK/RKay' तसंच 'Bouncer back' अशा चित्रपटांतून दिसणार आहे.