Rajesh Khanna and Amitabh Bachchan : बॉलिवूडमध्ये आजवर अनेक चित्रपट आले पण काही ठरावीक चित्रपट आहेत जे कल्ट चित्रपट आहेत. त्यापैकी एक म्हणजे एक चित्रपट आहे ज्यात सगळ्यात चांगली पटकथा आणि गाणी प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली आणि तो चित्रपट म्हणजे 'नमक हराम'. या चित्रपटाचे दिग्दर्शन ऋषिकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शन केलं. त्यातही तुम्हाला माहित आहे का की स्वत: दिग्दर्शकांनी कलाकारांना त्यांची भूमिका निवडण्याची संधी दिली होती. पण क्लायमॅक्स पाहून अमिताभ बच्चन यांना फार वाईट वाटलं होतं. चला जाणून घेऊया या चित्रपटाचा किस्सा...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1973 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'नमक हराम' चित्रपटातून अमिताभ आणि राजेश खन्ना या दोघांचं आयुष्य पालटलं. 30 लाख मध्ये बनवण्यात आलेल्या 'नमक हराम' या चित्रपटानं 1 कोटी पेक्षा जास्त कमावले. अमिताभ बच्चन यांच्याकडे तेव्हा जास्त काम नव्हतं. त्यामुळे दिग्दर्शकांनी हे ठरवलं की आधी अमिताभ बच्चन कलकारांसोबत सगळे सीन्स शूट करून घेतील. त्यासंबंधीत एक किस्सा दिग्गज अभिनेता असरानी यांनी सांगितला आहे. राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चननं एकत्र 'नमक हराम' मध्ये काम केलं. पण त्यावेळी त्या दोघांमध्ये खूप तणावात होता. त्यांनी चित्रपटाच्या सेटवर झालेल्या घटनेचा खुलासा करत सांगितलं की 'दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांनी राजेश आणि अमिताभ यांना भूमिका निवडण्याची सूट दिली होती. त्यावेळी राजेश खन्ना यांनी चित्रपटात मरणाऱ्या व्यक्तीची भूमिका निवडली, तर बिगी बींनी दुसरी भूमिका निवडली. पण अमिताभ यांना शेवटपर्यंत त्यांनी चूकिच्या भूमिकेची निवड केली असं वाटतं होतं. चित्रपटाच्या शेवटच्या दिवशीतर अमिताभ यांनी स्वत: ला एका रूममध्ये बंद करून घेतलं आणि ऋषि दा त्यांना रुममधून बाहेर काढण्यासाठी धमकीवजा भाषा वापरावी लागली.' 


असरानी पुढे म्हणाले की 'राजेश खन्ना यांच्यात तेव्हा सुप्योरिटी भावना होती. त्यांचं म्हणणं होतं की मला कोणी धक्का देऊ शकत नाही. मी खूप शक्तिशाली आहे. संपूर्ण चित्रपटा दरम्यान, त्या दोघांमध्ये तणाव दिसत होता. सुरुवातीला ऋषि दानं त्या दोघांना विचारलं की कोणती भूमिका साकारायची आहे. त्यांनी म्हटलं की दोन भूमिका आहेत. एक मरोत, एक भांडतो! तुम्ही ठरवा. त्यावेळी असं चित्र होतं की जो अभिनेता परद्यावर मरतो तो सगळ्यांचं मन जिंकतो आणि राजेश खन्ना यांनी तेच निवडलं.'


'नमक हराम' च्या शेवटच्या दिवशी राजेश खन्ना यांचा हार घातलेला फोटो फ्रेम मोहन स्टूडियोमध्ये लावण्यात आला होता. अमिताभ यांची रिपोर्टिंगची वेळे ही सकाळी 9.30 होती पण ते त्याआधीच आले होते आणि ते त्यांच्या मेकअप रूममध्ये जाऊन बसले. तर 10.30 वाजता ऋषि दा आले आणि त्यांनी त्यांच्या असिस्टं नितिन मुकेश यांना शॉटसाठी अमिताभ यांना बोलावण्यासाठी पाठवलं. नितिन आला आणि म्हणाला की तो दरवाजा खोलत नाही आहे. 


हेही वाचा : आता हृतिकवर घसरली अभिनेत्री कंगना, पंजाबच्या शेतकऱ्यांवर बोलल्यानंतर आणखी एक विधान!


अमिताभ यांना त्यावेळी चित्रपटात मृत असलेल्या व्यक्तीची भूमिका साकारता आली नाही यासाठी वाईट वाटून घेत होते. असरानी पुढे म्हणाले की 'त्यांना वाटलं की ते ऋषि दा ला चित्रपटाचा शेवट बदलण्यासाठी मनवू शकता. पण त्या आधीच हार घातलेला फोटो हा लटकलेला होता आणि ते पाहून अमिताभ यांची चिंता वाढली. त्यांना पाहून ऋषि दा म्हणाले 'अमित! काय झालं?' तर अमिताभ म्हणाले, 'तो फोटो...' ऋषि दानं उत्तर दिलं तुला म्हणायचं काय आहे? तुला सांगितलं होतं ना, तू ती भूमिका निवडलीस. आता तू मागे वळू शकत नाही. नाही तर राजेशचा फोटो काढून घेईन आणि चित्रपटपण बंद करेन. हे ऐकून अमिताभ सेटवर आले आणि त्यांनी शॉट दिला. याच चित्रपटानंतर अमिताभ सुपरस्टार झाले. एक सीन आहे ज्यात राजेश खन्ना यांचा अपघात होतो. अमिताभ त्यावेळी रागात बोलतात कोणी मारलं? या सीनवर प्रेक्षकांनी इतक्या टाळ्या वाजवल्या हे पाहून सगळ्यांना आश्चर्य झाले.' मात्र, याच चित्रपटानंतर राजेश खन्ना यांचं करिअर संपायला आलं. 'लवर बॉय' चा काळ संपला आणि 'अ‍ॅंग्री यंग मॅन' चा काळ सुरु झाला.