आता हृतिकवर घसरली अभिनेत्री कंगना, पंजाबच्या शेतकऱ्यांवर बोलल्यानंतर आणखी एक विधान!

Kangana Ranaut : कंगना रणौतनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळे तिनं हृतिकवर निशाणा साधल्याची चर्चा रंगू लागली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 30, 2024, 05:12 PM IST
आता हृतिकवर घसरली अभिनेत्री कंगना, पंजाबच्या शेतकऱ्यांवर बोलल्यानंतर आणखी एक विधान!  title=
(Photo Credit : Social Media)

Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत ही सध्या तिच्या 'एमरजंसी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिचा हा चित्रपट 6 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यासाठीच कंगना ही प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशात ती अनेक गोष्टींवर वक्तव्य करताना दिसत आहे. आता कंगनानं तिच्या एक्स बॉयफ्रेंडविषयी असं काही सांगितलं आहे की ज्यानंतर लोकं हृतिक रोशनशी जोडण्यात येत आहे. 

कंगना रणौतनं 'माशाबेल इंडिया' ला दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टीवर चर्चा केली. या दरम्यान, तिला विचारण्यात आलं की ती तिच्या एक्सच्या संपर्कात आहे किंवा त्याची मैत्रिण आहे? त्यावर उत्तर देत कंगनानं म्हटलं की 'ती अशी व्यक्ती नाही, जी तिच्या एक्सच्या संपर्कात राहिल. मी त्या टाईपची नाही. एक्ससोबत कधीच ती टचमध्ये नाही राहत.'

Kangana taking shots at hrithik ?
byu/Slurpmey inBollyBlindsNGossip

कंगना रणौतनं सांगितलं की 'मी खूप ट्रेडिशन्ल आहे. मी ती नाही की हा घटस्फोट घेऊन, हॅलो डार्लिंग... तू आहेस का, मला तुझी आठवण येते. मग घटस्फोट का घेतला? आता कंगना रणौतनं केलेल्या या वक्तव्यांनंतर लोकं विचार करत आहेत की नक्की तिनं कोणाकडे इशारा केला आहे. ती हृतिक रोशन आणि सुझान खानकडे तर इशारा करत नाही ना असं अनेकांचं म्हणणं आहे. कारण ते दोघे नेहमीच एकत्र दिसतात आणि हृतिक कधी कंगनासोबत रिलेशनशिपमध्ये होता.'

हेही वाचा : 'हॉटेलमधून बोलावून ऑडिशनच्या नावावर कपडे काढायला लावले अन्...' मल्याळम दिग्दर्शकाविरोधात अभिनेत्याची खळबळजनक तक्रार

कंगना रणौतला पुढे विचारण्यात आलं की 'तिच्या मनात अजूनही प्रेम आणि रोमान्सविषयी काही आहे. तर अभिनेत्रीनं सांगितलं की इतकीपण म्हातारी झाली नाही की माझ्या मनात रोमान्स नसेल. का नसेल बाबा? तर अभिनेत्रीनं प्रेम आणि रोमान्सविषयी सांगितलं की ज्या प्रकारे तिला वाटतं की एक पुरुष आणि महिला विभक्त होऊनही, संपूर्ण आयुष्यासाठी फीट राहतात. ते पाहून आनंद होतो. महिला आणि पुरुषात असलेला समतोल आणि त्यांच्यात लपलेला रोमान्स त्यात दिसून येतो.'