अहमदनगर : अहमदनगरमधल्या साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी पुकारलेलं बेमुदत उपोषण अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी मागे घेतलं. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी फोनवरून दिलेल्या आश्वासनानंतर दीपाली सय्यद यांनी आपलं उपोषण मागे घेतले आहे. साकळाई उपसा सिंचन योजना मंजूर करून काम सुरू करावं या मागणीसाठी, ९ ऑगस्टपासून दीपाली सय्यद उपोषण करत होत्या. या योजनेमुळे श्रीगोंदा आणि नगर तालुक्यातल्या दुष्काळी ३५ गावांना फायदा होणार आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र १ सप्टेंबरपर्यंत याबाबत योग्य निर्णय झाला नाही, तर २ सप्टेंबरपासून पुन्हा बेमुदत उपोषणाचा इशारा दीपाली सय्यद यांनी दिला आहे. गेल्या २० वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना मंजूर करण्याचं आश्वासन दिलं होतं. 


त्यांच्या या उपोषणाला कलाविश्वातून मोठ्या प्रमाणातून पाठिंबा मिळत आहे. अभिनेत्री मानसी नाईक, सीमा कदम, श्वेता परदेशी आणि सायली पराडकर यांनी पाठिंबा दिला आहे.