Tina Dutta Shocking Revealation Ex Boyfriend : छोट्या पडद्यावरील 'उतरन' (Uttaran) या मालिकेतीच इच्छाची भूमिका साकारणारी अभिनेत्री टीना दत्तानं (Tina Dutta) प्रेक्षकांची मने जिंकली. टीनानं आता सलमान खानच्या (Salman Khan) रिअॅलिटी शोमधील लोकप्रिय स्पर्धकांपैकी एक आहे. या कार्यक्रमानत सलमान खाननं शालीन भनोट (Shalin Bhanot) आणि टीनाच्या रिलेशनशिपवर वक्तव्य केलं आहे. सलमान खान टीनाला फेक असल्याचे म्हणाला होता. टीना ही शालिनच्या भावणांशी खेळते असं सलमान खान तिला म्हणाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शालीननं टीनासाठी असलेल्या त्याच्या भावना तिला सांगितल्या. यावेळी सलमाननं टीनाला खूप समजावले त्यानंतर टीनानं हे मान्य केलं की तिला शालीनसाठी फिलींग्स आहेत, मात्र तिला रिलेशनशिपमध्ये रहायचं नाही. टीनाचं हे वक्तव्य ऐकताच सलमानला धक्का बसला. यानंतर टीनानं असं वक्तव्य का केलं याचा खुलासा स्पर्धक श्रीजिता डेला याचे कारण सांगितले. टीनानं तिच्या पूर्वीच्या रिलेशनशिपविषयी सांगितले. तिचा एक्स बॉयफ्रेंड तिची मारहान करायचा. इतकंच नाही तर शिवीगाळ करायचा. (Tina Dutta Past Relatinship)


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


श्रीजीता डे ला सांगताना सगळ्यात आधी टीना म्हणाली, 'शालीन भनोटा खूप अग्रेसिव्ह आहे. या आधीच्या रिलेशनशिपमध्ये तिनं खूप काही सहन केले आहे. मारहाण आणि शिवीगाळ सहन केला आहे. मी जवळपास 5 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते आणि माझा एक्स बॉयफ्रेंड हा स्वभावानं खूप आक्रमक होता. तो माझ्याशी सतत भांडायचा. या कारणामुळे मी ब्रेकअप केलं होतं. (Tina Dutta Ex Boyfriend) 


टीना कोणाचे नाव न घेता, एक्स बॉयफ्रेंड विषयी सांगताना म्हणाली, 'सुरुवातीचं एक वर्षे खूप चांगलं होतं. मात्र, त्यानंतर सगळं हळू-हळू बदलू लागलं. बॉयफ्रेंडनं माझी मारहान केली आणि बऱ्याचवेळा कानशिलात लगावली. हा खुलासा टीनानं केला. यामुळे टीनाला आता या सगळ्याची भीती वाटत असल्याचे तिचे म्हणणे आहे. ' (Tina Dutta Ex Boyfriend Beaten Her)


हेही वाचा : Katrina Kaif ला कळत नाही का? एका प्रश्नाचं उत्तर देताना पतीलाच दुखावलं


टीनाही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. टीना सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. टीना ही बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. टीनानं उतरन सोबतच डायन (Daayan), कर्मफल दाता शनी (Karmaphal Daata Shani) , बेइंतहा (Beintehaa) सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.