Katrina Kaif ला कळत नाही का? एका प्रश्नाचं उत्तर देताना पतीलाच दुखावलं

Katrina Kaif नं सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी नुकताच संपर्क साधला होता. यावेळी तिच्या खासगी आयुष्याविषयी चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. यावर कतरिनानं दिलेल्या उत्तरानं सगळीकडे एकच चर्चा सुरु झाली आहे. 

Updated: Jan 11, 2023, 01:19 PM IST
Katrina Kaif ला कळत नाही का? एका प्रश्नाचं उत्तर देताना पतीलाच दुखावलं title=

Katrina Kaif Talk About Precious Thing at Home : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vick kaushal) हे कपल खूप लोकप्रिय आहे. विकी आणि कतरिनाच्या चाहत्यांना त्यांच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्याची उस्तुकता असते. कतरिना ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. कतरिनानं नुकताच सोशल मीडियावर चाहत्यांशी संपर्क साधला. यावेळी तिच्या चाहत्यांनी कतरिनाच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्याची संधी सोडली नाही. तर एका नेटकऱ्यानं कतरिनाला प्रश्न विचारला की तिच्या घरातील सगळ्यात मौल्यवान वस्तू कोणती आहे? या प्रश्नावर कतरिनानं दिलेल्या उत्तरानं तिचा पती विकीला नक्कीच दु: ख होणार असल्याचे म्हटले जात आहे. 

कतरिनानं इन्स्टाग्राम लाइव्ह करत तिच्या चाहत्यांशी संपर्क साधला होता. यावेळी एका नेटकऱ्यानं प्रश्न विचारला की तिच्या घरातील सगळ्यात मौल्यवान वस्तू कोणती आहे? चाहत्यानं विचारलेल्या याप्रश्नावर उत्तर देत कतरिना म्हणाली, माझ्यासाठी घरातील सगळ्यात खास माझे पती आहेत. मात्र, जर तुम्ही मौल्यवान वस्तू म्हणाल तर माझी पुस्तकं आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

काही दिवसांपूर्वी कतरिनाचा आगामी चित्रपट 'मेरी ख्रिसमस' लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची घोषणा करण्यात आली. या चित्रपटात कतरीना विजय सेतुपतीसोबत (Vijay Sethupathi) स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटातून कतरिना दाक्षिणात्य चित्रपटामध्ये पदार्पण करणार आहे. या दोघांचा हा पहिलाच एकत्र चित्रपट असणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी ख्रिसमसमध्ये प्रदर्शित होणार आहे. आता या दोघांची जोडी मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. हे पोस्टर शेअर करत हा चित्रपट आम्हाला यंदाच्या वर्षी प्रदर्शित करायचा होता. मात्र, आता प्लॅनमध्ये थोडे बदल झाले आहेत. लवकरच चित्रपटगृहात भेटूया... ख्रिसमसच्या शुभेच्छा! असे कॅप्शन तिनं दिले होते. 

हेही वाचा : 'मला तुझी आठवण येते...', Abhishek Bachchan च्या फोनवरून राणी मुखर्जीला मेसेज

दरम्यान, कतरिना कैफचा 'भूत पुलिस' (Bhoot Police) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही. तर लवकरच तिचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'टायगर 3' (Tiger 3) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 'टायगर' (Tiger) या फ्रेन्चायझीचा तिसरा भाग आहे. तर या चित्रपटात सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफ एकत्र दिसणार आहेत.