मुंबई : दोन दशकांपूर्वी टायटॅनिक या सिनेमाने एक वेगळीच जादू पसरवली होती. आता 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा सिनेमा पुन्हा एकदा प्रेक्षकांना मोहिनी घालायला येणार आहे. हा सिनेमा पुन्हा एकदा रिलीज होणार आहे. २० वर्षांनंतर  २डी आणि ३ डीमध्ये प्रेक्षकांना हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वाधिक कमाई करणा-या सिनेमांच्या यादीत आजही हा सिनेमा अव्वल आहे. 


 या सिनेमात जॅक व रोज साकारणारा अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रियो आणि अभिनेत्री केट विन्सलेट या दोघांच्या जोडीची केमिस्ट्री आणि पडद्यावरचा त्यांचा रोमान्स आजही प्रेक्षक विसरू शकलेले नाहीत. आता हा चित्रपट एका नव्या रूपात जॅक व रोजची केमिस्ट्री जिवंत करणार आहे.    


रिलीजआधी ‘टायटॅनिक’चे नवा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. यात चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स कॅमरून दिसत आहे. ‘टायटॅनिक’ दुस-यांदा रिलीज होत असला तरी प्रेक्षकांना आपण हा चित्रपट पहिल्यांदाच पाहतोयं, अशी अनुभूती देणारा असेल, असे कॅमरून या ट्रेलरमध्ये सांगताहेत. 



डॉल्बी व्हिजनसह रिलीज करण्यात येणारा हा चित्रपट केवळ अमेरिकेत पाहता येईल. येत्या १ डिसेंबरला अमेरिकेच्या एएमआर थिएटरमध्ये एक आठवडाभर चित्रपट दाखवला जाईल. अर्थात भारतातील प्रेक्षक तो ऑनलाईन  पाहू शकतील.