मुंबई : तारक मेहता का उल्टा चश्मा स्टारर बबीता जी म्हणजेच मुनमुन दत्ता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतीच बबिताने तारक मेहता मालिकेतील टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनाडकटसोबत साखरपुडा केला आहे. दोघांच्या कुटूंबीयांसोबत या दोघांनी एन्गेजमेन्ट केल्याचं वृत्त आहे. तारक मेहता या मालिकेत मुनमुनने ‘बबीता जी' ही भूमिका साकारली आहे. तर राज अनडकटने टप्पूची भूमिका साकारली होती. ही दोन्ही पात्र खूप गाजली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तारक मेहता हा असा शो आहे जो आजही लोकांना पहायला आवडतो. गेली अनेक वर्ष या शोने आपली लोकप्रियता टिकवून ठेवली आहे. या शोमधील प्रत्येक पात्र याच मालिकेतून घरा-घरात पोहचलं. शोमध्ये मुनमुन बबितीजीचं पात्र साकारत होती तर राज दिलीप जोशी यांच्या भूमिकेत दिसत होता. मात्र २०२२ साली या दोघांनी हा शो सोडला. शो संपल्यापासूनच या दोघांच्या अफेअर्सच्या बातम्या समोर येत होत्या. 



विरल भयानी यांच्या इन्स्टाग्राम पोस्टनुसार, या दोघांचा साखरपुडा पार पडला आहे. आहे तर  न्यूज 18 च्या विशेष रिपोर्टनुसार, अभिनेत्यांच्या जवळच्या सुत्राने सांगितलं आहे की, मुनमुन आणि राजने मुंबई बाहेर अगदी साधेपणाने साखरपुडा केला आहे. या दोघांच्या साखरपुड्याला या दोघांच्या जवळचा मित्र परिवार आणि त्यांचे कुटूंबीय उपस्थित होते. मात्र अद्याप तरी मुनमुन आणि राजने याबाबत अधिकृत वक्तव्य केलं नाही. किंवा फोटो शेअर केले नाहीयेत. 


खरंतर राज अनडकट 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये एन्ट्री घेतल्यापासूनच मुनमुनला डेट करत असल्याच्या बातम्या अनेकदा माध्यमांमध्ये आल्या आहेत. सेटवरही या दोघांचं नातं सगळ्यांना माहिती होती. इतकंच नव्हेतर गेले अनेक दिवस ते लग्न करणार असल्याचंही बोललं जात होतं. त्यामुळेच ते व्यस्त असल्याचंही बोललं जात होतं. असं सगळं असलं तरी अद्याप या जोडीने यावर मौन बाळगलं होतं. मात्र आता स्वत: मुनमून आणि राज यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या सगळ्या अफवा असल्याचं म्हणतं त्यांच्या साखरपुड्याच्या बातम्या फेटाळून लावल्या आहेत. तर विरल भयानीनेसुद्धा शेअर केलेली ही पोस्ट डिलीट करुन नवी पोस्ट शेअर करत यांची एन्गेजमेंन्ट झाली नसल्याचं सांगितलं आहे.