Rohit Verma On Nisha Rawal: एक्स स्टार कपल निशा रावल, करण मेहरा आणि रोहित वर्मा यांची मैत्री जगजाहीर आहे.करण मेहराने निशाला मारहाण केल्यानंतक फॅशन डिझायनर रोहित निशाच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. मात्र त्यानंतर निशा आणि रोहितचं बोलणं अनेक महिन्यांपासून बंद होते. अखरे रोहितने निशाबद्दलच्या नाराजीची बद्दलची चुप्पी तोडली. येवढंच नाही तर निशाबद्दलचा रागही व्यक्त केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका मुलाखतीत रोहितने निशाबद्दल अनेक खुलासे केले. तो म्हणाला, ''मी, निशा आणि करण एका कुटुंबासारखे होतो. मात्र 2014 निशा आणि करण यांच्या लग्नात प्रॉब्लेम सुरु झाले. त्यावेळी मी त्यांचं लग्न वाचवलं आणि करण कुठे चुकतोय आहे हे सांगितलं. पण निशा ही अशी व्यक्ती आहे जी प्रेमाची भुकेली आहे.'' (trending news rohit verma talk about nisha rawal and karan mehra in marathi)


निशाच्या बॉयफ्रेंडबाबत खुलासा


''निशाला तिच्या एक्स बॉयफ्रेंडकडून खूप प्रेम हवं होतं आणि ते तिला तेवढं प्रेम करायचे पण. ती एका विभक्त कुटुंबातून आली आहे आणि तिला तिच्या वडिलांचं प्रेम कधीच मिळालं नाही. तिच्या आईने तिला खूप धीराने वाढवलं. निशाचे एक्स बॉयफ्रेंड तिच्यावर खूप प्रेम करायचे. तिचा आयुष्याचा प्रवास मी पाहिला आहे. ती एक हुशार मुलगी आहे आणि तिच्या जिभेवर सरस्वती विराजमान आहे. ती कोणाला आपल्या बोलण्यातून खूष करायची. हा तिचा प्लस पॉइंट आहे आणि हाच तिचा यूएसपी आहे.'' 


निशाच्या चुकांवरही बोला रोहित 


रोहित म्हणाला की, "ती इतकी वाईट व्यक्ती नाही, पण जेव्हा तुम्ही तुमच्या मित्राच्या पाठीशी उभे राहता आणि तुमचा मित्र चुकीच्या मार्गावर जातो तेव्हा तुम्हाला त्याला सांगावं लागतं.मी कृष्णासारखा आहे आणि जर मला 1% सुद्धा काही चुकीचं आढळलं तर मी बोलतो." तेव्हापासून त्यांच्यातील संभाषण बंद आहे. 


रोहित हेही सांगायला विसरला नाही की, निशाने रोहितला मनोरंजन क्षेत्रात पहिला ब्रेक मिळवून दिला होता. 


यामुळे निशाच्या विरोधात रोहित 


करण मेहराने निशा रावल आणि रोहित सेठिया यांच्यातील नात्याचा आरोप केला होता. दरम्यान, निशासोबत असलेले सर्वजण आता तिच्यापासून वेगळे झाले आहेत. रोहित वर्माही त्यापैकीच एक आहे. रोहितला जेव्हा विचारण्यात आले की, ''निशाच्या विरोधात जाण्याचं त्याचं कारण काय? मग तो म्हणाला, "सगळं अगदी मोकळं आहे. मी एक अतिशय आधुनिक व्यक्ती आहे. मी कोणाबद्दलही भावना वाढविण्याच्या विरोधात नाही, पण एखाद्याने आपल्या मर्यादा विसरता कामा नये."