Kala Chashma Trending Video: सोशल मीडिया हे एक असं माध्यम आहे ज्यावर तुमच्या आवडीचा कंटेंट मिळतोच. सोबतच ट्रेंडिंग गोष्टीही समजतात. यामुळेच आपण सर्वजण सोशल मीडियाशी कनेक्ट राहणं पसंत करतो. असे अनेक व्हिडीओ किंवा पोस्ट असतात ज्या सोशल मीडियावर इतक्या प्रचंड प्रमाणात व्हायरल होतात की तो कंटेंट चर्चेचा विषय ठरतात. असाच एक जबरदस्त व्हिडीओ आता समोर आलेला पाहायला मिळतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हायरल व्हिडीओ भारतातील नाही हे स्पष्ट आहे. बरं, हा व्हिडीओ नक्की कुठला आहे हेही स्पष्ट झालेलं नाही. मात्र, या परदेशी मुलांच्या व्हिडिओमध्ये भारताचा बोलबाबाला नक्कीच पाहायला मिळतोय. कारण ही मुलं ज्या गाण्यावर जबरदस्त डान्स करतायत ते गाणं मुळात भारतीय आहे. 


या व्हिडिओमध्ये 2018 च्या बार बार देखो या सिनेमातील गाणं 'काला चष्मा' ऐकायला मिळतंय. यावर ही लहान मुलं जबरदस्त स्टेप्स करताना पाहायला मिळतायत. सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कतरिना कैफ यांनी याच गाण्यावर उत्तम परफॉर्मन्स दिला आहे. हे गाणं आजही लोकांना डान्स करायला भाग पाडतं. 


स्वदेशी कू प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तारक फताह नावाच्या युजरने हा व्हिडीओ अपलोड केल्याचं समजतं. "#India का सॉफ्ट पॉवर" असं कॅप्शनही यावर आपल्याला वाचायला मिळतं. 


चला पाहुयात हा व्हायरल व्हिडीओ: 




हा व्हिडीओ एडिट केलाय की खरंच या मुलांनी यावर डान्स केला आहे हेही समजू शकत नाही. मात्र एक गोष्ट मान्य करावीच लागेल, ती म्हणजे व्हायरल होणार हा व्हिडीओ. ,मुलांनी केलेल्या या स्टेप्स गाण्यांच्या वाक्यांशी तंतोतंत जाताना पाहायला मिळतात. 


trending video of kids dancing on indian Kala Chashma song video goes viral