Tunisha Sharma case : तुनिषाच्या आत्महत्येचं कारण उलघडणार? पोलिसांच्या हाती लागलं CCTV footage
CCTV footage in Tunisha Sharma case: मृत्यूपूर्वी तुनिषा शर्मा आणि शीझान यांच्यात जोरदार वाद (Argument Between Tunisha Sharma And Sheezan) झाल्याचं समोर आलं होतं.
Tunisha Sharma death case: टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने (Tunisha Sharma) नुकतीच आत्महत्या केली आहे. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता तुनिषा आईने (Tunisha Sharma Mother) पुन्हा एकदा शीझान खानवर (Sheezan Khan) गंभीर आरोप केले. त्यानंतर आता पोलीस (Waliv Police) या प्रकरणात कसून चौकशी करताना दिसत आहेत. आनंदी राहणाऱ्या तरूणीने आत्महत्येचं पाऊल का उचललं? तुनिषा शर्माने वयाच्या 20 व्या वर्षी मृत्यूला (Tunisha Sharma death) कवटाळण्याचं कारण काय होतं?, असा सवाल उपस्थित होत असताना आता पोलिसांच्या हाती मोठा पुरावा लागला आहे. (tunisha sharma sheezan khan heated argument cctv footage recovered by waliv police marathi news)
मृत्यूपूर्वी तुनिषा शर्मा आणि शीझान यांच्यात जोरदार वाद (Argument Between Tunisha Sharma And Sheezan) झाल्याचं समोर आलं होतं. ज्यावेळी दोघांच्यात वाद झाला त्यावेळचा सीसीटीव्ही फुटेज (CCTV footage) पोलिसांनी जप्त केलंय. त्यानंतर आता दोघांमध्ये नक्की काय घडलं होतं, याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामुळे आता शीझानच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पोलिसांनी शीझानला (Mumbai Police) ताब्यात घेतल्यानंतर कसून चौकशी केली. पोलिसांकडे कोणतेही पुरावे नाहीत, सर्व आरोप निराधार असल्याची माहिती शिझानच्या वकिलांनी दिली आहे. तुनिषाच्या आईने शिझानवर अनेक चुकीचे आरोप लावल्याचं देखील वकिलाने म्हटलं आहे.
आणखी वाचा - Tunisha Sharma च्या मृत्यूला वेगळं वळण, आनंदी असतानाही का केली आत्महत्या?
दरम्यान, तुनिषा शर्मा हिने वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी आपले नाव कमावले. खूप कमी वयात चांगला पैसा (Tunisha Sharma Property) कमावला होता. अवघ्या विसाव्या वर्षी तुनिषाने 15 कोटी रुपयाची संपत्ती मागे ठेवली आहे. आपल्या कलेत अवगत असलेल्या तुनिषाने असा निर्णय का घेतला? हा खरोखर अपघात होता की घातपात?, या अॅगलने देखील पोलीस तपास करत आहेत.