मुंबई : झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील पाठक बाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री अक्षया देवधर सध्या सोशल मिडियावर चांगलीच चर्चेत आहे. सोशल मिडियावर आपले फोटो आणि व्हिडिओ अक्षया शेअर करुन कायम आपल्या चाहत्यांच्य संपर्कात असते. सोशल मीडियावर ती अनेक गोष्टी अपडेट करत असेत.  नुकतीच तिने अशीच एक  गुड न्यूज तिच्या चाहत्यांना दिली आहे. त्यामुळे तिचे चाहते खूप खुश आहेत. पाठकबाई या नावाने घराघरात पोहचलेली अक्षया सध्या काय करते? हा सगळ्यांना प्रश्न पडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'ती सध्या काय करते'
अक्षयाने सोशल मिडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती गाडीची सफारी करताना दिसत आहे. त्याचबरोबर हा व्डिडिओ शेअर करत तिने 'नेत्रा' असं कॅप्शन दिलं आहे. आता तुम्ही म्हणाल की, पाठकबाईंनी 'नेत्रा' असं कॅप्सन का बरं दिलं. तर त्यामागे आहे पाठक बाईंचा झोल... होय, तुमच्या लाडक्या पाठक बाई लवकरच आपल्यासाठी एक ऑडीओ स्टोरी घेऊन येत आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)


सायली केदार लिखित ही कथा आपल्याला अक्षया देवधरच्या आवाजात स्टोरी टेल मराठीवर ऐकायला मिळणार आहे. कॉलेजच्या विविध झोलवर आधारित असलेल्या या कथेच नाव 'झोलर' असं आहे. नेत्रा या भूमिकेसाठी अक्षया आवाज देणार आहे. मुख्य म्हणजे अक्षयाचं हे पात्र रावडी आहे. 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत अंजली बाईंची भूमिका साकरलेली भोळी पण हुशार पाठक बाई रावडी भूमिकेसाठी सज्ज झाली आहे. पाठकबाईंच्या या नव्या भूमिकेसाठी त्यांचे चाहते  उत्सुक असल्याचं पहायला मिळत आहे. अलिकडेच अक्षयाने या बद्दलची माहिती इन्स्टाग्रामवर शेअर केली असून तिच्या या प्रोजेक्टसाठी चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.