मुंबई : टीव्ही इंडस्ट्रीमधून आपल्या अभिनय क्षेत्राची सुरवात करणारी बाल कलाकार फ्रुटीला कोण ओळखत नाही. सगळ्यांनी त्यांच्या बालपणात एक टिव्ही शो नक्कीच पाहिला असणार तो म्हणजे सोनपरी. सोनपरी ही त्याकाळातली सर्वात लोकप्रिय टीव्ही शोपैकी एक आहे. हा शो बराच वेळ टीव्हीवर सुरू होता. काही वर्षांपूर्वी हा शो संपला आहे. परंतु अजुनही बऱ्याच लोकांच्या आठवणीत हा शो आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीव्ही इंडस्ट्रीपासून सिनेसृष्टीत आपला ठसा उमटवणारी फ्रूटी म्हणजेच तन्वी हेगडे आता मोठी झाली आहे. सोन परी या शोमधून तन्वीने स्वतःची खास ओळख निर्माण केली होती. आजही लोक तन्वीला फ्रूटी म्हणतात. तन्वीच्या या दमदार व्यक्तिरेखेने लोकांच्या मनात कायमची खास ओळख निर्माण केली आहे.


नुकतेच तन्वी हेगडेचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. लोकांना हाच प्रश्न पडला आहे की, आपण लहानपणी ज्या लहान आणि निरागस मुलीला पाहिलं होतं ती आता इतकी बोल्ड झाली आहे, हे पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.


 तन्वी हेगडेने आपला संपूर्ण लुकच बदलला आहे. तन्वीने एक नवीन स्टाइल स्वीकारली आहे. या फोटोंमध्ये तिने आपले केस लाल रंगाचे केले आहे. एवढेच नाही तर तिने बॉयकट देखील केला आहे. त्यात काळ्या रंगाची शॉर्ट्स आणि टी-शर्ट या अभिनेत्रीचा लूक अगदी अनोखा बनवत आहेत.



तन्वी हेगडेच्या प्रोजेक्टबद्दल सांगायचे तर तिने टीव्हीसोबतच बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. ती पहिल्यांदा 'गज गामिनी' चित्रपटात दिसली होती. यानंतर 'चॅम्पियन', 'राहुल', 'फादर', 'वाह लाइफ हो तो ऐसी', 'चल चलें'. यासोबतच ती 'धुरंधर बटावडेकर', 'अथांग' या मराठी चित्रपटात दिसली आहे, तन्वीने शक लाका बूम-बूम या मालिकेतही काम केले आहे, मात्र तिला सर्वात जास्त लोकप्रियता 'फक्त फ्रुटी' या पात्रातूनच मिळाली.